जगात भारताचाच गाजावाजा; पाक अस्वस्थता वाढली; जपान दौऱ्यानं भारताला काय दिलं…

इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी जो बिडेन यांना अनेकदा फोन केला आणि त्यांनी त्यांचा फोनही उचलला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता टोकाची टीका केली जात आहे.

जगात भारताचाच गाजावाजा; पाक अस्वस्थता वाढली; जपान दौऱ्यानं भारताला काय दिलं...
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 11:04 PM

हिरोशिमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेसाठी जपानमधील हिरोशिमामध्ये होते. नरेंद्र मोदी यांचे तिथे गेल्यानंतर भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आले. त्यांच्या या भेटीमुळे आता सगळं जग आता भारत एक जागतिक दर्जाचा देश कसा आहे त्याची आता कबुलीच यानिमित्ताने होत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घट्ट मिठी मारुन त्यांच्याबद्दल असलेला आदर आणि आपुलकी व्यक्त केली. तर रविवारी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. यानिमित्ताने जगाला मोठा संदेशही मिळाल आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे आता पाकिस्तानाला मात्र भारताचा प्रभाव वाढत असल्याचे कळून आले आहे. यावेळी पाकिस्तान आपल्याच देशातील राजकीय कलहामुळे अस्वस्थ आहे.

त्यामुळे पाकिस्तानची अवस्था वाईट असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यामुळे दरिद्रीतून सुटका करुन घेण्यासाठी अन्नासाठी आणि महागाई कमी करण्यासाठी आता जगाकडे पैशांची मागणी केली जाते आहे.

ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीमध्ये पोहोचले होते, त्यावेळी मोदींचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. त्याचवेळी एखाद्या राष्ट्रप्रमुखाने दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाच्या पायाला स्पर्श केल्याचे यापूर्वी क्वचितच घडले आहे, मात्र यावेळी तसं दृश्य साऱ्या जगाने पाहिले आहे.

पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करताच त्यांना त्यांनी मिठी मारली. याशिवाय भारताच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलमध्येही बदल करण्यात आला आहे.

वास्तविक, पापुआ न्यू गिनीमध्ये आजपर्यंत इतर कोणत्याही देशाच्या नेत्याचे सूर्यास्तानंतर स्वागत झाले नाही, मात्र सूर्यास्त आधीच पंतप्रधान मोदींसाठी ही परंपरा खंडित करण्यात आली.

त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही शनिवारी G-7 बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी त्यांचा ऑटोग्राफही मागितला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुम्ही अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहे.

पुढच्या महिन्यात वॉशिंग्टनच्या भेटीदरम्यान त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी प्रमुख नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विनंत्या मिळत असल्याचेही बिडेन यांनी सांगितले. बिडेन हे स्वतः पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी ते तिथे खास पोहचले होते.

या बैठकीला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचाही उल्लेख केला.

ते म्हणाले की सिडनीमध्ये सामुदायिक स्वागतासाठी 20,000 लोकांची क्षमता आहे, परंतु तरीही लोकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

तसेच पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियालाही जाणार आहेत. पीएम मोदींचे स्वागत केल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने त्यांच्याच देशातील नेत्यांची खिल्ली उडवली आहे.

ते म्हणतात की इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी जो बिडेन यांना अनेकदा फोन केला आणि त्यांनी त्यांचा फोनही उचलला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता टोकाची टीका केली जात आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...