नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक परदेश दौरा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. पंतप्रधान मोदी रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचताच त्यांना एक वेगळा अनुभव आला. पोर्ट मोरेस्बी विमानतळावर हा दुर्मिळ क्षण जगाने पाहिला. कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं. पीएनजीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत तर केलंच पण सोबत त्यांना मोदींच्या पायाला स्पर्श करत त्यांचे आशीर्वाद ही घेतले.
पंतप्रधान मोदी ज्या देशात जातात तेथे त्यांचं जोरदार स्वागत होतं. त्या देशात राहणारे भारतीय देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मोदींचा प्रत्येक परदेश दौरा हा आतापर्यंत खास राहिला आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात प्रभावी नेते आहेत. त्यांचा करिष्मा अजूनही कायम आहे.
#WATCH | Prime Minister of Papua New Guinea James Marape seeks blessings of Prime Minister Narendra Modi upon latter’s arrival in Papua New Guinea. pic.twitter.com/gteYoE9QOm
— ANI (@ANI) May 21, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा पीएनजीच्या दौऱ्यावर गेले आहेत. पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी इंडो-पॅसिफिक देशाचा केलेला हा पहिला दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे पापुआ न्यू गिनी सूर्यास्तानंतर येणाऱ्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत करत नाही. परंतु पंतप्रधान मोदींसाठी हा अपवाद ठरला. त्यांना मोदींचे जोरदार स्वागत केले.
FIPIC शिखर परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे देश एकत्र येणार आहेत. 2014 मध्ये PM मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. FIPIC गुंतवणुकीव्यतिरिक्त, PM मोदी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे, पंतप्रधान मारापे आणि शिखर परिषदेत सहभागी होणार्या काही PIC नेत्यांशी देखील द्विपक्षीय संवाद साधतील.
#WATCH | Prime Minister Narendra Modi reaches Papua New Guinea, receives ceremonial welcome.
PM Modi’s visit is the first-ever visit by the Indian PM to Papua New Guinea. pic.twitter.com/E0srfABHAv
— ANI (@ANI) May 21, 2023
पापुआ न्यू गिनी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणामुळे सिडनीला देखील जाणार आहेत.रविवारी पंतप्रधान मोदी जपान दौरा संपवून पापुआ न्यू गिनीला रवाना झाले.
पंतप्रधान मोदी 19 ते 24 मे दरम्यान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया नंतर पंतप्रधान मोदी देशात परतणार आहेत. या पण या दरम्यान अनेक महत्त्वाचे करारांवर चर्चा होणार आहे.