फ्लाइटमध्ये येत होता दुर्गंध, सीटखाली डोकावल्यावर प्रवासी हादरलाच… तिथे असं काय होतं ?
फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीसोबत जे घडले ते हैराण करणारे आहे. तो प्रवासी विमानात बसल्यावर त्याला सतत दुर्गंध येत होता, मात्र सीटखाली डोकावल्यावर तो हादरलाच. असं काय पाहिलं त्याने ?
विमानातून प्रवास करताना (during flight) एखाद्याचे भांडण झाल्यास संपूर्ण वातावरण डिस्टर्ब होते, मात्र थोड्यावेळानंतर तो वाद शांत होतो. पण एफर फ्रान्सच्या एका फ्लाईटमध्ये प्रवाशासोबत जे झालं त्याने तो प्रवासी हादरलाच. खरं तर, पॅरिसहून टोरंटोला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीला त्याच्या सीटखाली एक विचित्र वस्तू दिसल्याने तो घाबरला. ते दृ्श्य पाहून तो अक्षरश: हादरला. त्याच्या सीटखाली रक्ताने माखलेला गालिचा होता.
फ्लाइटमध्ये येत होता दुर्गंध
हबीब बट्टाह याने ट्विटरवर त्याचा अनुभव शेअर केला आहे. ‘ फ्लाइटमध्ये बसून एक तास झाला होता. मात्र संपूर्ण वेळ दुर्गंध येत होता, मात्र तो कशामुळे हा काही समजत नव्हते. अखेरीस तो वास असह्य झाल्यावर मी आजूबाजूच्या सीटखाली डोकावून पाहिले. अखेर माझ्या सीटखाली डोकावलो असता मला तिथे एक मोठं कार्पेट दिसलं जे रक्ताने माखलं होतं. ते ओलंही होतं. त्यामुळे सीटखाली ठेवलेली माझी बॅगही रक्ताने माखलेली होती’ असं त्याने ट्विटमध्ये नमूद केले आहे.
केबिन क्रू ला सांगितलं पण…
त्यानंतर हबीब यांनी केबिन क्रूला याबद्दल सांगितले असता त्यांनी त्याला ते स्वच्छ करण्यासाठी काही टिश्यू दिले. हबीब हे जवळपास अर्धा तास गुडघ्यावर उभं राहून स्वच्छता करत होते. एअर फ्रान्सच्या कर्मचार्यांनी त्याला अधिक ग्लोव्ह्ज आणइ वाइप्स दिले. नंतर क्रू मेंबर्सनी त्याला सांगितले की आधीच्या फ्लाइटमधील एका प्रवाशाला काही कारणास्तव मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
I’ve seen a few things in my life, but the horrific blood-soaked carpet on my @airfrance plane yesterday was another level! An hour into the transatlantic flight from Paris to Toronto, I kept smelling something gross and couldn’t figure it out. Until I got up and looked down…(1 pic.twitter.com/if919aLlO8
— Habib Battah (@habib_b) July 1, 2023
त्या प्रवाशाचं काय झालं असेल ?
हे ऐकताच हबीब हैराण झाले. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या आजूबाजूला गर्दी केली होती आणि स्वच्छता पथकाने सीटच्या खाली नीट साफसफाई केली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मला मात्र त्या आधीच्या प्रवाशाचे काय झाले असेल, असा प्रश्न पडला होता, असे हबीब यांनी नमूद केले. त्याला इंटर्नल रक्तस्त्राव झाल्याचे मेंबर्सनी सांगितले होते, मात्र त्याला काही संसर्गजन्य आजार असेल तर मी किंवा इतर कोणत्याही प्रवासी त्याच्या संपर्कात येऊ शकलो असतो, हा विचार करूनच मला चिंता वाटू लागल्याचेही हबीब यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्यांची ही पोस्ट बरीच व्हायरल झाली असून अनेक युजर्सनीही आधीच्या प्रवाशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी तर यापुढे एअर फ्रान्सने प्रवास न करण्याचा निर्धारही व्यक्त केला.