Video| भारताचे लोक स्वाभिमानी कोणतीही महासत्ता भारतावर निर्बंध घालू शकत नाही; मात्र आरएसएसच्या विचारसणीमुळे आपण निराश – इमरान खान

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी भारताचे (India) कौतुक केले आहे. भारतीय लोक अतिशय स्वाभिमानी आहेत. कोणतीही महासत्ता भारतावर निर्बंध लादू शकत नसल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे.

Video| भारताचे लोक स्वाभिमानी कोणतीही महासत्ता भारतावर निर्बंध घालू शकत नाही; मात्र आरएसएसच्या विचारसणीमुळे आपण निराश - इमरान खान
मरियम नवाज यांनी इम्रान खानला भारतात जाण्याचा सल्ला दिलायImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 7:36 AM

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी भारताचे (India) कौतुक केले आहे. भारतीय लोक अतिशय स्वाभिमानी आहेत. कोणतीही महासत्ता भारतावर निर्बंध लादू शकत नसल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. माझे पूर्वीपासूनच क्रिकेटच्या निमित्ताने भारतासोबत संबंध आले. मला तिथे सन्मान मिळाला. मात्र मी आरएसएसच्या विचारसणीमुळे आणि भारत सरकारने काश्मीरमध्ये जे कलम 370 हटवले त्यामुळे आपण निराश असल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना इमरान म्हणले की, भारत आणि पाकिस्तान एकाच वेळेला स्वातंत्र्य झाले. मात्र भारताने चांगली प्रगती केली आहे. भारतीय लोक स्वाभीमानी आहेत, त्यांच्यावर कोणतीही बाह्य महासत्ता निर्बंध घालू शकत नाही. क्रिकेटच्या निमित्ताने माझे आणि भारताचे खूप जवळून संबंध आले.  मात्र तेथील आरएसएसच्या विचारसणीमुळे आपण निराश झाल्याचे इमरान यांनी म्हटले आहे.

इमरान खान असं का म्हणाले?

इमरान खान यांच्या सरकारवर विरोधी पक्षांनी महागाईच्या मुद्द्यावरून अविश्वासाचा ठराव आणला आहे. परंतु या अविश्वासाच्या ठरावा मागे इतर देशांचा हात असल्याचा संशय पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना आहे. पाकिस्तानचे सरकार पाडण्यासाठी विदेशी शक्ती सक्रिय झाल्याचे देखील त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवले. तसेच त्याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. त्यांनी या संदर्भात एका पत्राचा उल्लेख केला होता. पाकिस्तानचे सरकार  पाडण्यासाठी परदेशातून हस्तक्षेप होऊ शकतो, विरोधी पक्ष देशातील सरकार पाडण्यासाठी परदेशांची मदत घेतात. मात्र हे भारतामध्ये कधीही होऊ शकत नाही असेच यातून त्यांना सूचवायचे असेल अशी चर्चा आता सध्या होऊ लागली आहे.

आज मतदानाची शक्यता

विरोधी पक्षाने सरकारवर अविश्वाचा ठराव दाखल केल्यानंतर, सरकारला पाठिंब देणाऱ्या काही पक्षांनी अचानक आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे इमरान खान यांच्या बाजूने असलेली सदस्य संख्या कमी झाली आहे. अविश्वासाच्या ठरावावर मतदान झाल्यास सरकार कोसळणार असल्याचे निश्चित आहे. हेच ओळखून इमरान यांनी संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा निर्णय रद्द केला आहे. हा निर्णय अवैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संसदेचे गठन झाले असून, इमरान हेच पंतप्रधान आहेत. आज अविश्वास ठरावावर मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

26/11 Attack : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास; पाकिस्तान कोर्टाचा निकाल

Elom Musk : गांजा फुंकताना एलन मस्कने शेअर केला फोटो, नेटिझन्सही राहिले दंग, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

Imran Khan Government : इमरान खान यांची सुप्रिम कोर्टानं काढली विकेट! अविश्वास प्रस्तावाची अग्निपरीक्षा द्यावीच लागणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.