Petrol Diesel Price : बांग्लादेशात पेट्रोलचे दर एकाच दिवसात डबल, तरीही भारत त्याच दराच्या जवळपास, दरातला फरक किती?
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
बांगलादेशात (Bangladesh Fuel Price Crisis) सध्या महागाईचा (Inflation) डोंब उसळला आहे. पहिल्यांदाच इंधनाच्या किमती (Petrol Diesel Price) सर्वोच्च स्थानी पोहोचल्या आहेत. बांगलादेश सरकारने इंधनाच्या किमती 51.7 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. यासह एक लिटर पेट्रोल 130 टक्क्यांवर म्हणजेच 108.46 रुपये आणि एक लिटर डिझेल 114 टक्के म्हणजेच 95.11 रुपयांवर पोहोचले आहे. शेवटच्या वेळी बांगलादेश सरकारने 2016 मध्ये किमती बदलल्या होत्या, मात्र या किंमतीत एवढी वाढ होऊनही या किंमती भारताच्या जळपासच आहेत, 7 ऑगस्ट रोजी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले. गेल्या महिनाभराहून अधिक काळ देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 102.63 रुपये आणि 94.24 रुपये आणि कोलकातामध्ये 106.03 रुपये आणि 92.76 रुपये आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतातील किंमती वाढलेल्याच
भारतातील अनेक शहरांपेक्षा बांगलादेशात इंधनाच्या किमती जास्त असल्या तरी आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की भारतात इंधनाचे दर गेल्या अनेक दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.कोलकाता आणि बांगलादेशमधील किमतींची तुलना केल्यास असे दिसून येते की शेजारील देशात 51 टक्क्यांहून अधिक ऐतिहासिक वाढ होण्यापूर्वी पेट्रोल 37 रुपयांनी आणि डिझेल 28 रुपयांनी स्वस्त होते. भारतातील दर एवढे जास्त असूनही भारतातील तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 13.08 रुपये आणि डिझेलवर 24.09 रुपये तोटा सहन करावा लागत आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतातील दर पुन्हा वाढू शकतात.
तस्करीच्या भितीने किंमती वाढवल्या
अफगाणिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत दक्षिण आशियाई देशांमध्ये 1 ऑगस्टपर्यंत सर्वात कमी होती, जी 77.65 रुपयांच्या आसपास होती. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोल 101.06 रुपये आणि भूतानमध्ये 80.09 रुपयांना विकले जात होते. त्याच वेळी अडचणीत असलेल्या श्रीलंकेत प्रति लिटर 119.73 रुपये विकले जात होते, तर नेपाळमध्ये सर्वाधिक 113.69 रुपये प्रति लिटर विकले जात होते. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले जगातील इतर देश सातत्याने इंधनाच्या दरात फेरफार करत आहेत, अनेक देशात किमती वाढल्या आहेत, त्यात भारताचाही समावेश आहे. बांगलादेश सरकारचा दावा आहे की देशातील इंधनाच्या किमती कमी असल्याने शेजारील देशांमध्ये इंधनाची तस्करी सुरू झाली. त्यामुळे आगामी काळात देशातील तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात, असेही सांगण्यात येत आहे.