AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | नासाने टिपले 270 किलोमीटर उंचावरून ‘क्युरियोसिटी’चे छायाचित्र; पहा मंगळाच्या डोंगरावर चढणाऱ्या रोव्हरचा व्हिडिओ

अ‍ॅरिझोना विद्यापीठामध्ये चंद्र आणि ग्रह प्रयोगशाळेनुसार, नासाच्या मार्स रिकोनिसेन्स ऑर्बिटरने गेल क्रेटरच्या सेंटरजवळ मॉन्ट मर्कोवर चढणाऱ्या क्युरियोसिटी रोव्हरचा एक फोटो टिपला आहे. (Photo of ‘Curiosity’ from a height of 270 kilometers taken by NASA; Watch the video of the rover climbing the mountain of Mars)

VIDEO | नासाने टिपले 270 किलोमीटर उंचावरून ‘क्युरियोसिटी’चे छायाचित्र; पहा मंगळाच्या डोंगरावर चढणाऱ्या रोव्हरचा व्हिडिओ
नासाने टिपले 270 किलोमीटर उंचावरून ‘क्युरियोसिटी’चे छायाचित्र
| Updated on: May 24, 2021 | 12:25 AM
Share

नवी दिल्ली : अमेरिकन अंतराळ संस्था नासा गेल्या काही वर्षांत नवनवे संशोधन करू लागली आहे. अंतराळातील बरीच नवनवीन गुपिते उलगडण्यात या संस्थेला यश आले आहे. नजिकच्या काळात आणखी रहस्यांचा उलगडा करण्याचा निर्धार नासाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. याचदरम्यान 270 किलोमीटर उंचीवरून नासाने ‘क्युरियोसिटी’चे छायाचित्र टिपले आहे. मंगळाच्या डोंगरावर चढाई करणाऱ्या रोव्हरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अ‍ॅरिझोना विद्यापीठामध्ये चंद्र आणि ग्रह प्रयोगशाळेनुसार, नासाच्या मार्स रिकोनिसेन्स ऑर्बिटरने गेल क्रेटरच्या सेंटरजवळ मॉन्ट मर्कोवर चढणाऱ्या क्युरियोसिटी रोव्हरचा एक फोटो टिपला आहे. (Photo of ‘Curiosity’ from a height of 270 kilometers taken by NASA; Watch the video of the rover climbing the mountain of Mars)

एमआरओने 18 एप्रिल रोजी आपल्या ‘हाय रिझॉल्युशन इमेजिंग सायन्स एक्सपेरिमेंट टूल’चा वापर करून हा फोटो टिपला होता. ‘हाय रिझॉल्युशन इमेजिंग सायन्स एक्सपेरिमेंट टूल’ अत्यंत लहानात लहान वस्तूही टिपण्यात सक्षम आहे अर्थात या टूलद्वारे लहानात लहान वस्तूचाही फोटो काढता येतो. हायआरआयएसई टीमच्या माहितीनुसार, रोव्हरपासून 167.5 मैलांच्या उंचीवरूनही कारच्या आकाराचा क्युरोयोसिटी रोव्हर अगदी स्पष्टपणे दिसत होता. 2014 पासून क्युरियोसिटी रोव्हर 3 मैल उंच माऊंट शार्पची चढाई करीत आहे, लाल ग्रहावरील सूक्ष्मजीव जीवनाच्या मागील संकेतांचा शोध घेणे हे यामागील उद्दीष्ट आहे.

मॉन्ट मार्कोचा शोध घेत आहे रोव्हर

मार्चच्या सुरुवातीच्या काळात क्युरियोसिटीने मॉन्ट मार्कोवर चढाई सुरू केली, ज्याला फ्रान्समधील एका डोंगराचे नाव देण्यात आले आहे. मंगळ ग्रहावर दोन वर्षांत क्युरियोसिटीने पुष्टी केली की, गेल क्रेटर जीवनासाठी उपयुक्त अशा रासायनिक घटकांनी भरलेला एक सरोवर होता. यानंतर क्युरियोसिटीने सेंद्रीय पदार्थ शोधून काढला आहे. मंगळ ग्रह कोरडा पडल्यावर लहान आणि खारट तलाव बनल्याचे पुरावे सापडले आहेत.

येत्या काही वर्षांत मंगळ ग्रहावरील आणखी काही रहस्यांचा उलगडा होणार असल्याचे शुभसंकेत आहेत. क्युरियोसिटी मंगळाच्या भूतकाळाविषयी अधिक रहस्यांचा उलगडा करू शकेल, अशी शक्यता खगोलशास्त्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेच्या क्युरियोसिटीचे उप-प्रकल्प वैज्ञानिक अबीगैल फ्रॅमॅन यांनी एका व्हिडिओ अपडेटमध्ये सांगितले आहे की मॉन्ट मार्कोच्या पुढे सल्फेटच्या टेकड्या आहेत. त्यामुळेच आपण पुढे वाटचाल करीत आहोत, असा दावा फ्रॅमॅन यांनी केला आहे.

मीठ शोधण्याच्या अगदी जवळ

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचा क्युरियोसिटी रोव्हर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर मीठ शोधण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ज्यावरून हे समजेल की प्राचीन काळामध्ये लाल ग्रहावर अर्थात मंगळ ग्रहावर जीवन होते की नाही? मेरीलँडच्या ग्रीनबेल्टमधील नासा गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील वैज्ञानिक सध्या रोव्हरद्वारे टिपण्यात आलेली छायाचित्रे आणि डेटाचा सखोल अभ्यास करीत आहेत. मंगळावर सेंद्रिय किंवा कार्बनयुक्त मीठ अस्तित्त्वात असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. याचे एजन्सीने सेंद्रीय संयुगांचे सेंद्रिय कंपाऊंड म्हणून वर्णन केले आहे. (Photo of ‘Curiosity’ from a height of 270 kilometers taken by NASA; Watch the video of the rover climbing the mountain of Mars)

इतर बातम्या

Baleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट

मोठी बातमी! कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य, सर्व खर्च टाटा उचलणार

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.