इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात चकवाल जिल्ह्यातील ढोके फुलारी गावात मदरशात शिकणाऱ्या मुलींचंच लैंगिक शोषण झालंय. आरोपी मौलानाने अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण (Molestation) तर केलेच शिवाय व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला (Physical abuse of childrens by Maulana in Madarsa in Pakistan).
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मागील 3 वर्षांपासून आरोपी मौलाना मदरशामधील मुलींचं शोषण करत होता. तसेच त्या मुलींची व्हिडीओ देखील करत होता. शोषण झालेल्यांमध्ये 4 मुलींचा आणि एका मुलाचा समावेश आहे. ही सर्व मुलं मदरशात जात होते.
आरोपी मौलनाचं सहकाऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर प्रकरण उघड
आरोपी मौलाना अनेक वर्षांपासून हा सर्व प्रकार करत होता. त्याने आतापर्यंत हे सर्व इतरांपासून लपवून ठेवले. मात्र, या गुन्ह्यात त्याचा सहकारी असलेल्या अन्य आरोपीसोबत त्याचं भांडण झालं आणि हा प्रकार उघड झाला. मुलांचं लैंगिक शोषण आणि त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात मौलानासोबत हा सहकारी देखील सहभागी होता. मात्र, मौलानासोबत वाद झाल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत मौलानाची पोलखोल केली.
व्हिडीओ लिक करण्याची धमकी देत शोषण
मौलानाचा सहकारी चकवाल उप पोलीस अधीक्षक सिकंदर गोंडल यांच्याकडे आला. त्याने सांगितलं की आम्ही चार मुलींचं आणि एका मुलाचं लैंगिक शोषण केलंय. या सर्वांचं वय 6 ते 12 वर्षांच्या दरम्यान आहे. त्याने पोलिसांना विश्वास व्हावा म्हणून व्हिडीओ देखील दाखवला. यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी पीडित मुलांशी देखील चर्चा केली. यात मौलानाने एकाचं पाच वेळा शोषण केल्याचं सांगितलं. तसेच मौलाना व्हिडीओ लिक करण्याची धमकी देत शोषण करायचा असंही नमूद केलं.
मौलानाकडून 10 अश्लील व्हिडीओ जप्त
प्राथमिक तपासात मौलानाने 4 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. पीडितांचे डीएनए नमुने देखील तपासणीसाठी फॉरेंसिक लॅबला पाठवण्यात आलेत. आरोपीकडे 10 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. त्याशिवाय काही मेमरी कार्ड देखील जप्त करण्यात आलेत. यात अश्लील व्हिडीओ आहेत. त्या व्हिडीओंची देखील फॉरेंसिक तपासणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
पाकिस्तान कर्जात नाकापर्यंत बुडालं, चीनच्या डावात अलगद फसलं!
व्हिडीओ पाहा :
Physical abuse of childrens by Maulana in Madarsa in Pakistan