काय म्हणायचं आता? या भाऊने तर डायरेक्ट विमानच चोरी केले आणि…
तुपेलोच्या विमानतळावरुन बिचक्राफ्ट किंग Air-C90A हे नऊ आसनी विमान गायब झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शानस आले. ऑनलाइन फ्लाइट ट्रॅकिंगच्या मदतीने विमानाचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. यावेळी हे विमान वॉलमार्टजवळ आकाश घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. पायलटसह संपर्क साधून विमान लँड करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या उलट पायलटने विमान वॉलमार्ट क्रॅश करण्याची धमकी दिली.
वॉशिंग्टन : कोण काय करेल याचा काही नेम नाही. असाच एक विचित्र प्रकार अमेरिकेत घडला आहे. एका व्यक्तीने थेट विमानच हायजॅक केले. वॉलमार्ट हे शॉपिंगमॉलमध्ये विमान क्रॅश करण्याची धमकी देखील अपहरणकर्त्याने दिली. तब्बल पाच तास हे विमान वॉलमार्टजवळ घिरट्या घालत होते. अखेरीस इंधन संपत आल्यावर हे विमान एका शेतात लँड करण्यात आले. यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
अमेरिकेतील नॉर्थ मिसिसिपी परिसरात हे थरार नाट्य घडले. शनिवारी सकाळी एका विमानाचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्याने विमान अनेक तास शहरभर फिरवले. यानंतर त्याने थेट पोलिसांनाच वॉलमार्ट मॉलमध्ये विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. तब्बल पाच तास हे थरार नाट्य सुरु होते.
अखेरीस हे विमान लँड झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी पायलट हा तुपेलोच्या प्रादेशिक विमानतळाचा कर्मचारी आहे. त्याने विमान का हायजॅक केले याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
तुपेलोच्या विमानतळावरुन बिचक्राफ्ट किंग Air-C90A हे नऊ आसनी विमान गायब झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शानस आले. ऑनलाइन फ्लाइट ट्रॅकिंगच्या मदतीने विमानाचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. यावेळी हे विमान वॉलमार्टजवळ आकाश घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. पायलटसह संपर्क साधून विमान लँड करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या उलट पायलटने विमान वॉलमार्ट क्रॅश करण्याची धमकी दिली.
तब्बल पाच तास पोलिस या पायलटला समजवण्याचा प्रयत्न करत होते. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा अधिकार्यांनी वॉलमार्ट तसेच त्याच्या जवळपासची दुकाने रिकामी केली आणि नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवले.
अखेरीस विमानातील इंधन संपत आले. यानंतर पायलट विमान लँड करण्यास राजी झाला. विमान एका शेतात उतरवण्यात आले.या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पायलटच्या या कृत्यामुळे तब्बल पाच तास नागरीक दहशतीत होते.
Currently we have a 29yr old who stole this plane & is threatening to crash it into something. Polices ,ambulances ,& fire trucks are everywhere. Everything is shutdown rn pic.twitter.com/AzebdIa3tP
— City King (@CityKing_Gank_) September 3, 2022