‘या’ ठिकाणी केवळ 1.5 रुपये लिटर पेट्रोल, टाकी फूल करायला किती रुपये लागतात?

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel latest price) आकाशाला गवसणी घालत आहेत.

'या' ठिकाणी केवळ 1.5 रुपये लिटर पेट्रोल, टाकी फूल करायला किती रुपये लागतात?
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 10:00 PM

काराकास : भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel latest price) आकाशाला गवसणी घालत आहेत. सध्या पेट्रोलच्या प्रति लिटर दराने नव्वदी पार केलीय, तर डिझेल 81 रुपयांवर पोहचले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणाऱ्या वाढीचा थेट परिणाम महागाईवर होत असतो. देशात मालवाहतुकीसाठी सर्वाधिक वापर ट्रकचा होतो. त्यामुळेच इंधनाचे दर वाढले की वाहतुकीचा खर्च वाढतो आणि अंतिमतः वस्तूंच्या किमतीही वाढतात. त्यामुळे महागाईचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. असं असलं तरी जगात असं एक ठिकाण आहे जिथं पाण्याच्या किमतीपेक्षाही स्वस्त दरात पेट्रोल मिळतं (Place where Cheapest Petrol sold in just 1.5 rupees per litre).

जगात सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल कुठं आहे, भारतापेक्षाही महाग पेट्रोल डिझेल कोणत्या देशात आहे आणि आपल्या शेजारी देशांमध्ये पेट्रोलचे दर काय आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पेट्रोलविषयी बोलायचं झालं तर जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएला या देशात आहे. तेथे एका लिटर पेट्रोलची किंमत केवळ 1.46 रुपये (4 जानेवारी) आहे. दुसऱ्या नंबरवर इराण आहे. तेथे पेट्रोलचे प्रतिलिटर दर 4.24 रुपये आहेत. अंगोलामध्ये पेट्रोलची किंमत 17.88 रुपये लिटर आहे. या तिन्ही देशांमध्ये पेट्रोलचे रेट पाण्यापेक्षाहही स्वस्त आहेत. बाजारात 1 लिटर पाणी घ्यायचं म्हणलं तरी 20 रुपये लागतात.

जगातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

ग्लोबल पेट्रोल डिझेल प्राईस डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये सर्वात महाग पेट्रोल असून त्याची किंमत प्रतिलिटर 169.21 रुपये इतकी आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये 150.29 रुपये, सीरियात 149.08 रुपये, नेदरलँडमध्ये 140.90 रुपये, नार्वेत 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये 133.90 रुपये आहे. इंग्लंडमध्ये पेट्रोल 116 रुपये, स्विझर्लंडमध्ये 115 रुपये, जर्मनीत 116 रुपये, जपानमध्ये 93.62 रुपये, ऑस्ट्रेलियात 68.91 रुपये आणि अमेरिकेत 50.13 रुपये प्रति लिटर दर आहेत.

शेजारी देशांमधील पेट्रोल दर

भारताचे शेजारी देश असलेल्या चीनमध्ये 72.62 रुपये, नेपाळमध्ये 67.41 रुपये, अफगानिस्तानमध्ये 36.34 रुपये, बर्मामध्ये 43.53 रुपये, रशियात 42.69 रुपये, पाकिस्तानमध्ये 48.19 रुपये, भूतानमध्ये 49.56 रुपये, श्रीलंकेत 62.79 रुपये प्रति लिटर दर आहे.

हेही वाचा :

Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढीला केवळ रविवारची सुट्टी, पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा वाढले

आधी अक्षयकुमार, आता महानायकाच्या जुन्या ट्वीटचे आव्हाडांकडून ‘उत्खनन’

Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढ सुरुच, 16 दिवसात पेट्रोल प्रतिलिटर नऊ रुपयांनी महाग

Place where Cheapest Petrol sold in just 1.5 rupees per litre

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.