दिल्ली : भारत आणि कॅनडा (Canada) या दोन देशात मागच्या काही दिवसांपासून वादविवाद सुरु आहे. सध्या तणाव स्थिती असताना एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. कॅनडामध्ये विमानाचा अपघात (Canada Plane Crash) झाला आहे. त्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या अपघातामध्ये दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही पायलट मुंबईचे (Mumbai pilot) रहिवासी आहेत. त्याचबरोबर त्यांची नाव अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी आहेत.
दोन्ही वैमानिकांचे नातेवाईक मुंबईत आहेत. त्यांना शनिवारी अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका तरुणाचा देखील मृ्त्यू झाला आहे. ज्यावेळी अपघात झाल्याची माहिती मिळाली तेव्हा परिवाराला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक एका छोट्या इंजिनाच्या विमानातून प्रवास करीत होते. ब्रिटिश कोलंबियामध्ये वैंकूवरच्या जवळ चिलिवैकमध्ये स्थानिक विमानतळाजवळ हा अपघात झाला आहे.
अभय गडरू हा प्रशिक्षिण घेण्यासाठी जाण्यापूर्वी जवळच्या कृष्णा वंदन सोसायटीत राहत होता. सोसायटीतील सगळ्या लोकांशी अभय आपुलकीचं नातं होतं. ज्यावेळी अभयचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना समजली, त्यावेळी त्यांना देखील धक्का बसला आहे.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोन वैमानिकांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अभयने शनिवारी सकाळी त्याच्या घराशेजारी असलेल्या मित्राला सकाळी पाच वाजता फोन केला होता. त्याचा भाऊ चिराग मागच्या एक वर्षापासून तिथं अभ्यास करीत आहे. कॅनडातल्या अधिकाऱ्यांनी अभयच्या भावाला त्याचा मृतदेह अद्याप पाहण्यास परवानगी दिलेली नाही. त्यांनी रविवारी अभयचं सामान देणार असल्याचं सांगितलं आहे.
ज्यावेळी वैभव गोयल या शेजाऱ्याशी चिरागने फोनवरती बोलणं झालं. त्यावेळी चिराग अधिक चिंतेत होता. तो तिथल्या भारतीय अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. चिरागला अभयचा मृतदेह भारतात आणायचा आहे. चिरागचे आई-वडिल त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत.