Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘लिजन ऑफ ऑनर’ मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान

प्रतंप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना फ्रान्सकडून लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'लिजन ऑफ ऑनर' मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान
PM Modi France Visit Live UpdatesImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 9:00 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सच्या ‘लीजन ऑफ ऑनर’ (legion of honour) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा फ्रान्सचा (France) सर्वोच्छ सन्मान आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. आतापर्यंत फ्रान्स या देशाने जगातील निवडक नेत्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. देशातल्या या नेत्यांना आतापर्यंत सन्मानित केले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, किंग चार्ल्स, माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बुट्रोस बुट्रोस-घाली फ्रान्सने अशी देशातील नेत्यांची नावं आहेत.

मोदींना आतापर्यंत कोणकोणते सन्मान मिळाले.

इजिप्तने पंतप्रधान मोदींना जून 2023 मध्ये ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ या पुरस्काराने सन्मानित केले. पापुआ न्यू गिनीद्वारे मे 2023 मध्ये ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’या पुरस्काराने सन्मानित केले. मे 2023 ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने सन्मानित केले. पलाऊ देशाने मे 2023 मध्ये ‘अबकल’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

2021 मध्ये भूतानचा ड्रुक ग्याल्पो, 2020 मध्ये यूएस सरकारकडून ‘लीजन ऑफ मेरिट’, 2019 मध्ये बहरीनचा किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स, 2019 मध्ये मालदीवकडून निशान इज्जुद्दीनचा विशिष्ट नियम, सेंट अँड्र्यूचा ऑर्डर रशियाचा पुरस्कार, पंतप्रधानांना 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीकडून ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार, 2018 मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, 2016 मध्ये अफगाणिस्तानचा स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान आणि ऑर्डर ऑफ अब्दुलअजीझ अल सौद यांनी सन्मानित केले. सौदी अरेबिया द्वारे 2016 मध्ये इतक्या पुरस्काराने त्यांना आतापर्यंत सन्मानित केले आहे.

हे सुद्धा वाचा

मोदींचा सन्मान झाल्यानंतर एलिसी पॅलेसमध्ये रात्री जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. मोदी दोन दिवस फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. काल ते फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न विमानतळावर मोदींचं स्वागत केलं.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.