PM Narendra Modi Thailand Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या या दौऱ्यात थायलंडमधील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहेत. दरम्यान, मोदी यांनी शुक्रवारी (4 फेब्रुवारी) वाट फ्रा चेतुफोन विमोन मंगखलाराम राजवरमहाविहानचा दौरा केला. यावेळी थायलंडच्या पंतप्रदान शिनावात्रा यादेखील होत्या.
आपल्या या भेटीत त्यांनी गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला अभिवादन केले. तसेच वरिष्ठ बौद्ध भिक्षूंना संघदानही केले. दरम्यान, हे मंद या मंदिराला ‘वाट फो’ असेदेखील म्हटले जाते. बँकाँक शहरातील हे सर्वाधिक जुने आणि सर्वाधिक मोठ्या मंदिरापैकी एक मंदीर आहे. हे मंदीर एकूण 20 एकर भूभागात पसरलेले आहे. या मंदिर परिसरात आकर्षक सजावट केलेली आहे. अनेक मूर्ती तसेच सुंदर उद्यानही आहे.
या मंदिराची निर्मिती 16 व्या शतकात करण्यात आली होती. राज राम प्रथम यांच्या शासनकाळात हे मंदीर उभारण्यात आले होते. या मंदिराला अगोदर वाट फोटाराम या नावानेही ओळखले जायचे. या मंदिराचा उपयोग अगोदर पारंपरिक उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केला जायचा. नंतरच्या काळात आलेल्या राजांनी या मंदिराचा विस्तार केला. राजा राम तृतीय यांच्या काळात या मंदीर परिसरातील इमारतींचा विकास करण्यात आला. तसेच अनेक मूर्ती बनवण्यात आल्या.
Today, I had the honour of visiting the historic Wat Phra Chetuphon Wimonmangkalaram Ratchaworamahawihan Or Wat Pho in Bangkok. I thank Prime Minister Paetongtarn Shinawatra for the special gesture of coming to the Temple with me. One of Thailand’s most revered spiritual… pic.twitter.com/5xIDGPmcrX
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025
भारताच्या परराष्ट्र धोरणात वेगळं असं महत्त्व आहे. 2024 साली नंरेंद्र मोदी यांनी भारत-आशियाई शिखर संमेलनात लाओसचे राष्ट्रपती थोंगलून सिसोउलिथ यांना एक जुनी आणि दुर्मिळ अशी बुद्ध मूर्ती भेट दिली होती. या मूर्तीकडे दोन देशांतील समान वारसा आणि संस्कृतिक संबंधांच्या दृष्टीने भारताची वचनबद्धता याचे प्रतिक म्हणून पाहिले गेले. 2023 मध्ये मोदी आणि जपनाचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दिल्लीमध्ये बुद्ध जंयती पार्कमध्ये बोल बोधीवृक्षाला भेट दिली होती. 2022 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेला नेपाळमध्ये जाऊन लुम्बिनीचा दौरा केला होता. 2017 साली श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना मोदी यांनी गंगारामया बौद्ध मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यातील धार्मकि आणि सांस्कृतिक संबंध बळकट झाले. 2016 साली मोदी यांनी व्हिएतनामच्या दौऱ्यावर असताना हनोई येथे क्वान सू पॅगोडाचा दौरा केला होता. तेथे त्यांनी बौद्ध भिक्खूंसोबत चर्चाही केली होती.