ब्राझीलमध्ये ड्रग्ज माफिया आणि पोलिसांमध्ये चकमक; 28 नागरिकांनी नाहक जीव गमावला
पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली तेव्हा अनेक ड्रग्ज व्यापाऱ्यांनी घराच्या छतांवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. | raid in Rio de Janeiro
रिओ दी जानेरो: ब्राझीलची राजधानी असलेल्या रिओ दि जानेरो शहरात पोलिसांच्या एका कारवाईत (Raid in Rio de Janeiro ) 28 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. गुरुवारी स्थानिक पोलिसांनी काही ड्रग्ज व्यापाऱ्यांना पकडण्यासाठी ही कारवाई केली होती. मात्र, यामध्ये निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला. (Police raid in Rio de Janeiro leaves 28 dead)
पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली तेव्हा अनेक ड्रग्ज व्यापाऱ्यांनी घराच्या छतांवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हा झोपडपट्टीचा परिसर आहे. पोलीस याठिकाणी जय्यत तयारीनिशी आले होते. पोलिसांच्या ताफ्यात चिलखती गाड्या (Armored vehicles) आणि हेलिकॉप्टर होते. याठिकाणी चकमक सुरु झाली तेव्हा नागरिक आपल्या घरात लपून बसले. तरीही चकमकीदरम्यान अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर ब्राझीलमधील मानवी अधिकार संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. ही ब्राझीलमधील गेल्या 16 वर्षातील क्रूर घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या चकमकीत निष्पाप नागरिक मारले जाणे हे निंदनीय आणि असमर्थनीय आहे.
संबंधित बातम्या:
चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट नेमकं कधी पृथ्वीवर पडू शकतं? जीवसृष्टीला धोका काय?
PHOTOS : ग्वाटेमालात ज्वालामुखीचा भीषण स्फोट, नदीप्रमाणे लाव्हारस वाहताना दिसला, पाहा…
(Police raid in Rio de Janeiro leaves 28 dead)