पेट्रोल आणि डिझेल नव्हे तर या प्रदूषणाने होतात ९० टक्के मृत्यू, पाहा कोणत्या ?

प्रदुषण आपल्या मानवी जीवनासाठी सर्वात मोठा धोका आहे. परंतू तुम्हाला वाटत असेल की पेट्रोल आणि डिझेलचे प्रदुषण मानवी जीवनास सर्वात धोकादायक असून त्यानेच सर्वाधिक मृत्यू होतात तर ते चुकीचे आहे. जगभरातील गरीब राष्ट्रात प्रदुषणाने होणाऱ्या जिवितहानीस अन्य प्रदुषण जबाबदार आहे. कोणते ते पाहा

पेट्रोल आणि डिझेल नव्हे तर या प्रदूषणाने होतात ९० टक्के मृत्यू, पाहा कोणत्या ?
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 1:33 PM

प्रदुषणानाला पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने सर्वाधिक जबाबदार समजले जात होते. परंतू अलिकडे द लॅसेंट जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जगभरात जंगलांना लागणाऱ्या वणव्याने ९० टक्के मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात होत असल्याचे उघडकीस आले आहे.या देशात भारताचा देखील समावेश आहे. अन्य देशात चीन, इंडोनेशिया आणि सहारा, आफ्रीका येथील देशांचा समावेश आहे.जेथे लॅण्ड स्केप फायर ( वणवा ) यांच्या कारणाने होणाऱ्या आजारांचा सर्वाधिक भार आहे.

लॅण्डस्केप फायरचा कहर

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या (Monash University, Australia) संशोधनासह एका आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या ग्रुपला असे आढळले की लॅण्ड स्केप फायरने सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामात भौगोलिक आणि सामाजिक – आर्थिक असमानता आहे.

लॅण्डस्केप फायर म्हणजे जंगलांना लागणारे वणवे हे मानव निर्मित आणि नैसर्गिक असा दोन्ही प्रकारचे आहेत. जास्तीत जास्त मृत्यू अशा प्रकारच्या आगीने होणाऱ्या हवेच्या प्रदुषणाने होत असतात. ज्यामुळे मोठ्या कालावधीपर्यंत हृदय आणि श्वसनासंबंधीचे आजार वाढत असतात.

हे सुद्धा वाचा

किती मृत्यू होतात ?

या अभ्यासात प्रदुषणाने हृदयासंबंधीत आजाराने वार्षिक सुमारे ४.५ लाख मृत्यू होतात आणि श्वसनाच्या संबंधीत आजाराने वर्षाला सुमारे २.२ लाख मृत्यू होत असतात. त्यामुळे जंगलाला लागणाऱ्या वणव्याने होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता समजून येते. साल २०००-२०१९ दरम्यान २०४ देश आणि क्षेत्रातील वार्षिक मृ्त्यूदर, लोकसंख्या आणि सामाजिक डेमोग्राफीक डाटाचे संशोधकानी विश्लेषण केले. जे २०१९ ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्डटीजमधून घेतला होता. हा युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ मॅट्रीक्सने कॉर्डीनेट केला आहे.  हा डाटा काळानुसार जगभरातील आरोग्य हानीचे “सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक” कारण जंगलातील वणवे आहेत.

आता काय उपाय केला जाऊ शकतो?

जागतिक हवामान बदल आणि जंगलांना लागणाऱ्या वणव्यांमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलायला हवीत. कमजोर राष्ट्रांच्या मदतीसाठी उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांनी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करुन मृत्यूदरातील सामाजिक- आर्थिक असमानता दूर करण्यासाठी मदत करायला हवी आहे. या प्रयत्नांना क्लायमेट चेंजेस आणि अनुकूल धोरणांना जोडायला हवे, त्यामुळे जंगलातील वणव्यांच्या प्रदुषणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीवर उपाय मिळेल अस तज्ज्ञांनी म्हटले आहे. संशोधनात ग्लोबल फायर एमिशन डेटाबेसचा देखील वापर केला होता.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.