Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूकंपाने उद्ध्वस्त म्यानमार पुन्हा हादरलं, शेकडो लोकांचा मृत्यू, अफगाणिस्तानातही बसले भूकंपाचे धक्के

म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानंतर अजूनही अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, शुक्रवारी रात्री 11:56 वाजता (स्थानिक वेळेनुसार) म्यानमारमध्ये 4.7 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. तर त्यापाठोपाठ अफगाणिस्तानमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.2 इतकी होती.

भूकंपाने उद्ध्वस्त म्यानमार पुन्हा हादरलं, शेकडो लोकांचा मृत्यू, अफगाणिस्तानातही बसले भूकंपाचे धक्के
भकंपामुळे अनेकांचा मृत्यू,अफगाणिस्तानही जामवले भूकंपाचे धक्केImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 9:11 AM

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता अफगाणिस्तानमध्येही शनिवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 5 वाजून 16 मिनिटांच्या आसपास भूकंपाचे धक्के बसले, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.7 इतकी मोजली गेली. मात्र या भूकंपामुळे अद्याप कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झालेली नाही. शुक्रवारी म्यानार, थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे आत्तापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्याही प्रचंड आहे. यामुळे अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणात खाली कोसळल्या, बौद्ध स्तूप, रस्ते आणि पूलही काही क्षणांतच उद्ध्वस्त झाले.

म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी मोजवी गेलवी, मात्र कालच्या भूकंपाननंकतर आजही अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, म्यानमारमध्ये शुक्रवारी रात्री 11:56 वाजता (स्थानिक वेळेनुसार) दुसरा भूकंप झाला, त्याच तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजली गेली. NCS च्या मते, हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर जाणवला, ज्यामुळे आफ्टरशॉकची शक्यता आहे.

महत्नाचे अपडेट्स

हे सुद्धा वाचा

– म्यानमार आणि शेजारच्या थायलंडमध्ये अनुक्रमे 7.7 आणि 7.2 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे इमारती, पूल आणि बौद्ध मठ नष्ट झाले. म्यानमारमध्ये 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी आहेत. सर्वात जास्त नुकसान झालेल्या दोन शहरांमधील फोटो आणि व्हिडिओ हे धडकी भरवणारे दिसत आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे निर्माणाधीन एक उंच इमारत कोसळून किमान 10 जणांचा मृत्यू झाला.

– म्यानमारमध्ये,भूकंपामुळे झालेले मृत्यू, जखम आणि नुकसानीचा अद्याप पूर्ण अंदाज लावण्यात आलेला नाही. सध्या देश गृहयुद्धात अडकला आहे आणि लष्करी राजवटीमुळे माहितीवर कडक नियंत्रण ठेवण्यात आहे.”मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, अशी माहिती म्यानमारच्या लष्करी सरकारचे प्रमुख, वरिष्ठ जनरल मिन आंग हलाईंग यांनी दिली. आत्तापर्यंत 150 च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला असून 730 जण जखमी झाल्याचे समजते.

– थायलंडची राजधानी बँकॉकमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका उंच इमारतीसह तीन बांधकाम साइट कोसळल्याने 10 लोक ठार, 16 जखमी आणि 101 बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी दुपारी7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडालेजवळ होता. या भूकंपानंतर, आणखी आफ्टरशॉक देखील बसले, त्यापैकी एकाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजली गेली. मंडालेमध्ये, भूकंपामुळे शहरातील सर्वात मोठ्या मठांपैकी एकासह अनेक इमारती कोसळल्याचा अहवाल आहे.

– म्यानमारची राजधानी नेपीडॉ येथील विनाशाचे अनेक पोटो समोर आले असून, त्यामध्ये बचाव पथकाचे अधिकारी नागरी सेवकांच्या निवासस्थानाच्या अनेक इमारतींच्या ढिगाऱ्यातून पीडितांना बाहेर काढताना दिसले. सर्वाधिक प्रभावित भागात रक्ताची नितांत गरज असल्याचे म्यानमार सरकारने सांगितले.

भारतातर्फे मदतीचा हात

– विनाशकारी भूकंपाचा फटका बसलेल्या म्यानमारसाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. 15 टन मदत सामग्री मदत म्हणून पाठवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे C-130J सुपर हर्क्युलस विमान हिंडन एअरफोर्स स्टेशनवरून मदत साहित्य घेऊन म्यानमारला रवाना झाले. त्यामध्ये ज्यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्स, ब्लॅंकेट्स, खाण्यासाठी तयार अन्न, वॉटर प्युरिफायर, सॅनिटेशन किट, सौर दिवा, जनरेटर सेट, आवश्यक औषधे (पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युलस, सिरिंज, हातमोजे, कॉटन स्वॉब, इ.) यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्राने म्यानमारला मदत आणि बचाव कार्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्स दिले आहेत.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेचा अंदाज 

– भूकंपामुळे तुटलेले रस्ते, कोसळलेले पूल आणि तुटलेले बंधारे यांच्या बातम्या समोर येत आहेत, आधीच मानवतावादी संकटाशी झुंजत असलेल्या देशातील दुर्गम भागात बचाव पथके कसे पोहोचतील याची चिंता सर्वंना सतावत आहे. ‘या भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाचे मूल्यांकन करण्यासाठी आम्हाला काही आठवडे लागू शकतात, अशी शंका म्यानमारचे डायरेक्टर जनरल मोहम्मद रियास यांनी व्यक्त केली. या भूकंपामधील मृतांचा आकडा 1000 पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने व्यक्त केला आहे.

– थायलंडपेक्षा म्यानमारमध्ये भूकंप तुलनेने अधिक सामान्य आहेत. 1930 ते 1956 दरम्यान, देशाच्या मध्यभागी जाणाऱ्या सागिंग फॉल्टच्या बाजूने 7.0 तीव्रतेचे सहा शक्तिशाली भूकंप झाले, अशी बातमी AFP ने USGS चा हवाला देऊन वृत्त दिले. थायलंड भूकंपाच्या क्षेत्रात येत नाही आणि तिथे जाणवलेले सर्व भूकंप हे शेजारच्या देशातून, म्यानमारमधून येतात. बँकॉकमधील इमारती शक्तिशाली भूकंपांना तोंड देण्यासाठी तयार नसल्यामुळे, येथील इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

– संयुक्त राष्ट्र म्यानमारसाठी मदत सामग्री गोळा करत आहे. ते म्हणाले की, म्यानमार सरकारने आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे, असे संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी शुक्रवारी सांगितले.बाधित लोकांना मदत करण्यासाठी क्षेत्रातील संसाधने एकत्रित करण्यासाठी देशात संयुक्त राष्ट्राची टीम संपर्कात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्यानमारला मदत करण्याचे आश्वासन दिले.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.