तुर्कीतील विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली; जाणून घ्या यानंतरची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांचा जन्म बुल्गेरिया येथे १९११ झाला. लहानपणीचं त्यांचे डोळे निकामे झाले. ८६ वर्षांच्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी केलेल्या काही भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात.
नवी दिल्ली : बाबा वेंगा यांची डायना यांच्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली. त्यानंतर त्यांनी ९-११ च्या दहशतवादी हल्ल्याची तसेच बराक ओबामा यांच्या अमेरिकेचे राष्ट्रपती होण्याची भविष्यवाणी (Prophecy) खरी ठरली. तुर्कीतील भूकंपानंतर त्यांनी आणखी भविष्यवाणी केली आहे. तुर्की आणि सीरियात भूकंपामुळं (Turkey Earthquake) ८ हजार लोकांचा जीव गेला. शेकडो इमारती निस्तनाबूत झाल्या. नेदरलँडचे संशोधक फ्रँक हुगरबीट्स यांची भविष्यवाणी गंभीरतेने घेतली असती तर काही जीवतहानी वाचविता आली असती. हुगरबीट्स यांनी तीन फेब्रुवारीला सांगितलं होतं की, सीरिया आणि तुर्कीत मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे.
फ्रँकने ३ फेब्रुवारीला एक ट्वीट केलं, आज किंवा उद्या ७.५ रेश्टर स्केलचा भूकंप दक्षिण मध्ये तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनानमध्ये होऊ शकतो. ही भविष्यवाणी भूगर्भीय हालचाली आणि ग्रहांच्या अभ्यासातून करत आहेत.
बाबा वेंगा यांनी केल्या या भविष्यवाणी
भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगा यांनी काही जोरदार भविष्यवाणी केल्यात. त्यापैकी बऱ्याच गोष्टी खऱ्या ठरल्या. राजकुमारी डायना हिच्या मृत्यूची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती. अमेरिकेवरील ९-११ च्या हल्ल्याची केलेली भविष्यवाणीही खरी ठरली. आणखी बाबा वेंगा यांनी कोणत्या भविष्यवाणी केल्या होत्या.
Sooner or later there will be a ~M 7.5 #earthquake in this region (South-Central Turkey, Jordan, Syria, Lebanon). #deprem pic.twitter.com/6CcSnjJmCV
— Frank Hoogerbeets (@hogrbe) February 3, 2023
लॅबमध्ये होणार मुलाचा जन्म
बाबा वेंगा यांनी येत्या काळात बाळाचा जन्म लॅबमध्ये होईल, अशी भविष्यवाणी केली होती. आईवडील बाळांचा रंग आणि लिंग ठरवू शकतील. लॅबमध्ये बाळांचा जन्म झाल्यानंतर जन्माची पारंपरिक पद्धती कमी होईल.
जैविक हत्यारांचा हल्ला
बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये जैविक हत्यारांचा हल्ला होऊ शकतो. त्यात लाखो लोकांचा जीव जाईल. रशियाचे राष्ट्रपती यांनी युक्रेनवर जैविक हत्यारांचा प्रयोग केला आहे.
बाबा वेंगा यांच्याबाबत
बाबा वेंगा यांचा जन्म बुल्गेरिया येथे १९११ झाला. लहानपणीचं त्यांचे डोळे निकामे झाले. ८६ वर्षांच्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी केलेल्या काही भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात. जगाचा निरोप घेण्यापूर्वी ५०७९ पर्यंतच्या भविष्यवाणी त्यांनी केल्या आहेत.
(टीप – ही माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारावर आहे. टीव्ही ९ या गोष्टी खऱ्या ठरण्याची शक्यता व्यक्त करत नाही.)