Death of a Pregnant Woman : गर्भवती भारतीय पर्यटकाचा मृत्यू, पोर्तुगालच्या आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा
34 वर्षीय भारतीय गर्भवती महिलेला लिस्बनमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात होते. दरम्यान, या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे लागलीच महिलेला लिस्बनमधील सर्वात मोठे असलेले रुग्णालय सांता मारिया येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल होताच सदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिलेली आहे.
मुंबई : आपल्या विभागाच्या कारभारामुळे जर कुणाला जीवाशी मुकावे लागत असेल त्याचा उपयोग काय? याचाच पश्चाताप करीत (Portugal) पोर्तुगालच्या (Health Minister resigns) आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचे झाले असे, गर्भवती असलेल्या (Indian Tourist Women) भारतीय पर्यटक महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत असातानाच हृदयविकाराचा झटका आला होता. सदरील महिलेला सर्वात मोठ्या असलेल्या सांता मारिया रुग्णालयात नेले जात होते. मात्र, रुग्णालयात दाखल होताच त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. पोर्तुगालमधील हॉस्पिटल्सच्या डिलिव्हरी युनिटमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. या दुर्देवी घटनेमुळेच मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.
नेमकी घटना काय?
34 वर्षीय भारतीय गर्भवती महिलेला लिस्बनमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात होते. दरम्यान, या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे लागलीच महिलेला लिस्बनमधील सर्वात मोठे असलेले रुग्णालय सांता मारिया येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल होताच सदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिलेली आहे. सिझेरियनंतर मात्र उत्तम आरोग्यासाठी बाळावर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध सुरु आहे.
आरोग्यमंत्र्यांचा मात्र तडकाफडकी राजीनामा
गर्भवती असलेल्या भारतीय पर्यटक महिलेच्या मृत्यूची बातमी समोर येताच पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. मात्र, 2018 पासून त्या आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या तर कोविड काळातही त्यांनी आरोग्य यंत्रणा चांगल्या प्रकारे हताळली होती. मात्र, आपल्या विभागाचा असा कारभार यावरुन मंगळवारी त्यांनी हा राजीनामा दिल्याचे समजत आहे.
पोर्तुगाल सरकारचे काय आहे स्पष्टीकरण?
पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी याबाबत सांगितले की, सदरील महिलेच्या मृत्यूमुळेच टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तामध्ये हेच कारण आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून अशाच प्रकारच्या घटना पोर्तुगालमध्ये घडलेल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्भकांनाही आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये गर्भवती महिलांवर उशिरा उपचार झाल्याने ह्या घटना घडल्या होत्या.