google ने डीलीव्हरीजवळ आलेल्या प्रेग्नंट महिला कर्मचाऱ्याला थेट नोकरीवरूनच काढले
गुगलने मास लेऑफ अंतर्गत सुमारे 12000 कर्मचाऱ्यांना थेट नारळ दिला आहे. एका आठवडाभरात प्रेग्नंसीच्या रजेवर जाणाऱ्या कॅलिफोर्नियास्थित एका महिला प्रोग्रॅमर मॅनेजरला या निर्णयाचा फटका बसला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहीले आहे..
कॅलिफोर्निया : google या अमेरीकेच्या बड्या आयटी कंपनीने कोरोनानंतरच्या मास लेऑफ ( layoffs ) अंतर्गत आपल्या 12000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. मात्र यात एका आठवड्यावर प्रेग्नंसीच्या रजेवर जाणाऱ्या प्रोग्रॅमर मॅनेजर महीला कर्मचाऱ्यालाही कामावरून काढल्याने या महिला कर्मचाऱ्याने कंपनीला समाजमाध्यमावर ( LinkedIn ) पोस्ट टाकून चांगलेच खडसावले आहे. या महिला कर्मचाऱ्याला अनेकांनी सुहानुभूती दाखवत पाठींबा दर्शवला आहे.
गुगलने मास लेऑफ अंतर्गत सुमारे 12000 कर्मचाऱ्यांना थेट नारळ दिला आहे. गुगल कंपनीने या घेतलेल्या निर्णयाने एका आठवडाभरात प्रेग्नंसीच्या रजेवर जाणाऱ्या कॅलिफोर्नियास्थित प्रोग्रॅमर मॅनेजर कॅथरीने वोंग यांनाही कामावरून काढून टाकल्याची नोटीस आली आहे. त्यांना याचा प्रचंड धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मिडीयावर रात्री उशीरा एक पोस्ट टाकीत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न या पोस्टव्दारे केला आहे. या पोस्टला प्रतिक्रीयांचा पाऊस पडला असून त्यांना सहानूभूती मिळत आहे.
LinkedIn वर पोस्ट टाकत कॅथरीने वोंग यांनी आपली व्यथा मांडली आहे. त्या म्हणतात, मी माझा फोन उघडला तर कंपनीचा मेल पाहून मला प्रचंड धक्का बसला. मी ही त्या 12000 कर्मचाऱ्यांत समाविष्ट आहे. मनात पहीला प्रश्न आला, मीच का ? आताच का ? मला हे पचायला जड जात आहे. मी आठवडाभराने रजेची कागदपत्रे सादर करून प्रेग्नंसीच्या रजेची तयारी करीत होते. माझ्या बाळाच्या आगमनाच्या तयारीत मी आनंदात असताना ही बातमी मला ही निगेटीव्ह बातमी मिळाल्याने मला दु:ख झाले आहे. आता 34 आठवडे मला नविन जॉब प्रेग्नंसीमुळे शोधता येणार नाही. मी नुकताच कंपनीची अवघड प्रोजेक्ट हँडल केला होता असेही त्यांनी म्हटले होते.
त्यांनी पढे लिहीले आहे की, ‘ माझ्या कंपनीचा आणि कंपनीच्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. माझ्या गुगल कंपनीसाठी मी इतकी मेहनत घेतली त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा फोनचा इनबॉक्स प्रतिक्रीयाने भरला आहे. सर्वांना माझी आणि माझ्या येऊ घातल्या बाळाची काळजी वाटत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. या त्यांच्या पोस्टला सुहानूभूती मिळत आहे.