ट्रम्प 10,796 वेळा खोटं बोलले, वॉशिंग्टन पोस्टनं पाढा वाचला

ट्रम्प खोटं बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोटं बोलण्याचा हिशोबच मांडलेला आहे. त्यांच्या अहवालानुसार ट्रम्प 869 दिवसांमध्ये 10,796 वेळा खोटं बोलले आहेत.

ट्रम्प 10,796 वेळा खोटं बोलले, वॉशिंग्टन पोस्टनं पाढा वाचला
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 3:37 PM

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भेटीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावरुन केलेल्या दाव्यानंतर मोठा गोंधळ उडाला. ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना काश्मीर प्रश्नावर भारताचे पंतप्रधान मोदींनी आपल्याला मध्यस्थीसाठी विचारणा केल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ भारताने यावर आक्षेप घेत भारताकडून अशी कोणतीही विचारणा केलेली नसल्याचे स्पष्ट केले. यातून भारताने अप्रत्यक्षरित्या ट्रम्प खोटं बोलत असल्याचेच संकेत दिले. मात्र, ट्रम्प खोटं बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोटं बोलण्याचा हिशोबच मांडला आहे. त्यांच्या अहवालानुसार ट्रम्प यांनी आत्तापर्यंत खोटं बोलण्यात 10,000 चा टप्पा ओलांडला आहे. 2018 पर्यंत ट्रम्प दररोज सरासरी 17 वेळा खोटं बोलत होते.

ट्रम्प म्हणाले होते, “भारताचे पंतप्रधान मोदी यांनी माझ्याकडे काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी विचारणा केली होती. त्यासाठी मी देखील तयार आहे.” पाकिस्तान या काश्मीर प्रश्नाला मोठं करण्यासाठी तिसऱ्या देशाच्या मध्यस्ततेची मागणी करत आहे, तर भारताने हा केवळ द्विपक्षयीय मुद्दा असल्याचे म्हणत कोणत्याही तिसऱ्या पक्षाला सहभागाला विरोध केला आहे. मात्र, ट्रम्प यांनी स्वतः मोदींनी ही विचारणा केल्याचे म्हटल्याने भारतीय संसदेपासून अमेरिकेपर्यंत याचे पडसाद उमटले. यातील एक मोठा प्रवाह ट्रम्प खोटं बोलत असल्याच्याच मताचा होता.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हात झटकले

ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा दावा केला असला तरी पाकिस्तान आणि अमेरिकेच्या राष्ट्र प्रमुखांच्या संयुक्त पत्रकार परिषेदत काश्मीर विषयावर काहीही भाष्य करण्यात आलेले नव्हते. मात्र, ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही एकप्रकारे आपले हात झटकले आहे. ते म्हणाले, “काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील द्विपक्षीय मुद्दा आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन त्याविषयी चर्चे केली पाहिजे हीच अमेरिकेची भूमिका आहे. दोन्ही देशांनी यावर चर्चा केली तर ट्रम्प प्रशासन याचे स्वागत करेल आणि त्यांच्या मदतीलाही तयार असेल. दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यासाठी काही प्रयत्न होत असतील आणि चर्चेला पोषक वातावरण तयार होत असेल तर अमेरिकेचा याला पाठिंबा आहे.”

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या या निवेदनात कुठेही पंतप्रधान मोदींनी मध्यस्थीचे आमंत्रण दिल्याचा उल्लेखही आला नाही.

वॉशिंगटन पोस्टने डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोटं बोलण्याची आकडेवारीच समोर ठेवली

अमेरिकेचे प्रसिद्ध वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या खोटं बोलण्याचा हिशोबच केला आहे. वर्तमानपत्राच्या फॅक्ट चेकर्सच्या आकडेवारीनुसार ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 100 दिवसांमध्येच 492 वेळा खोटं बोलले. हाच आकडा पुढे वाढून 2 वर्षात 8,158 वेळा खोटं बोलण्यापर्यंत गेला. 2018 मध्ये त्यांच्या खोटं बोलण्याची सरासरी दिवसाला 17 वेळा खोटं बोलणे अशी होती. अगदी परराष्ट्र धोरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर ते तब्बल 900 वेळा खोटं बोलले आहेत.

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या प्रमुख पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांमध्ये गडबड असल्याचं वॉशिंग्टन पोस्टला आढळलं. त्यानंतर वर्तमानपत्राने ट्रम्प यांच्या संशयास्पद दाव्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. या पडताळणीतून ट्रम्प यांच्या खोटारडेपणाची आकडेवारीच तयार झाली. 2018 पर्यंत ते सरासरी 17 वेळा खोटं बोलत होते. म्हणजेच दर सव्वा तासाला ते एकदा खोटं बोलायचे. सध्या ट्रम्प यांचा खोटं बोलण्याच स्कोर 869 दिवसांमध्ये 10,796 खोटं बोलणं असा आहे. त्यामुळे काश्मीरबाबत केलेलं त्यांचं विधानही यापैकीच एक होता, असंच बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.