Prince Philip : इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलीप यांचं 99 व्या वर्षी निधन
Prince Philip died : क्वीन एलिझाबेथ द्वितीय ( Queen Elizabeth II) यांचे पती प्रिन्स फिलीप (Prince Philip) यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे.
लंडन : क्वीन एलिझाबेथ द्वितीय ( Queen Elizabeth II) यांचे पती प्रिन्स फिलीप (Prince Philip) यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. बकिंगहॅम पॅलेसने याबाबतची घोषणा केली. प्रिन्स फिलिप यांनी 1947 मध्ये राजकुमारी एलिझाबेथ यांच्याशी लगीनगाठ बांधली होती. ब्रिटीश राजघराण्यातील हे सर्वात प्रदीर्घ काळसेवा देणारं जोडपं ठरलं. प्रिन्स फिलीप आणि क्वीन एलिझाबेथ यांना चाल मुलं, आठ नातवंड आणि 10 परतुंडे आहेत. (Prince Philip died aged 99, Queen Elizabeth II’s husband took last breath Buckingham Palace announces)
दरम्यान, प्रिन्स फिलीप यांच्या निधनाबाबत बकिंगहम पॅलेसने याबाबत पत्रक जारी केलं आहे. ” राणी एलिझाबेथ यांनी अत्यंत दुख:द घोषणा केली आहे. प्रिय पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला”
Breaking News: Prince Philip, Duke of Edinburgh, husband of Queen Elizabeth II, father of Prince Charles and defender of the monarchy, has died at 99.https://t.co/7egVdmkM3U pic.twitter.com/I8OFwynhiU
— The New York Times (@nytimes) April 9, 2021
राष्ट्रीय दुखवटा
प्रिन्स फिलीप यांच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटनवर दुखवटा आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींमधील ब्रिटीश ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनावरील उपचारानंतर डिस्चार्ज
प्रिन्स फिलीप यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मागील महिन्यात 16 मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 99 वर्षीय फिलीप यांना 16 फेब्रुवारीला लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना संसर्ग आणि हृदय रोगावरील उपचारासाठी त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
जालीयनवाला बाग हत्याकांडातील जखमींची संख्या विचारली
प्रिन्स फिलीप हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठीही ओळखले जात होते. भारतात त्यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडातील (Jallianwala Bagh massacre) जखमींच्या संख्येवरुन प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी भारतीय मीडियात त्यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलं होतं.
प्रिन्स फिलीप हे चारवेळा भारतात आले होते. तीनवेळा राणी एलिझाबेध यांच्यासोबत तर एकदा स्वतंत्र भारतभेटीवर आले होते. जेव्हा ते 1997 मध्ये भारतात आले होते, त्यावेळी त्यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडावर भाष्य केलं होतं. या हत्याकांडातील जखमी मृतांची संख्या विचारली होती.
संबंधित बातम्या
जगावर वाढत्या स्फोटकांच्या वापराचा धोका, संयुक्त राष्ट्राकडून वेळीच पावलं उचलण्याचं आवाहन
पाकिस्तान कर्जात नाकापर्यंत बुडालं, चीनच्या डावात अलगद फसलं!