Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने कोमेजले अनेक कळ्यांचे आयुष्य, या देशात पर्यटनाच्या नावाखाली व्याभीचार

मध्य - पूर्वेतील पर्यटक येथे पर्यटनाच्या नावाखाली येतात आणि कोवळ्या तरुण मुलींशी कंत्राटी विवाह करतात. त्यानंतर मौजमजा केल्यानंतर या मुलींना तलाक देऊन ते पुन्हा आपल्या देशात निघुन जातात.

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने कोमेजले अनेक कळ्यांचे आयुष्य, या  देशात पर्यटनाच्या नावाखाली व्याभीचार
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 7:17 PM

ती अवघ्या सतरा वर्षांची तर तो पन्नाशीचा..या दोघांचे लग्न इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे एका थ्री स्टार हॉटेलात काही मोजक्या लोकांच्या उपस्थित झाले. हे लग्न इस्लामिक कायद्याच्या वादग्रस्त तरतूदीनुसार झाली. कहाया हीचा ( नाव बदललेले आहे ) सौदी अरब येथून आलेल्या एका पर्यटकासोबत निकाह लावून देण्यात आला. लग्नानंतर कहाया हीची मोठी बहीण देखरेखीसाठी तिच्या सोबत गेली. कहाया हीचे लग्न लावणारा एजंट देखील एक पालक म्हणून त्यांच्या सोबत गेला.

सौदी अरब येथील पर्यटकाने कहाया हिच्याशी तात्पुरते लग्न करण्यासाठी 850 डॉलर ( 71, 387 रुपये ) हुंडा मोजला होता. एजंट आणि मौलवी यांची फी कापून कहायाच्या कुटुंबाला अर्धी रक्कम टेकविण्यात आली. लग्नानंतर कहायाला तिचा नवरा जकार्ता पासून 2 किमी दूरवरील दक्षिणेकडील कोटा बंगा शहरातील एक रिसॉर्टमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने कहाया हीच्या शारीरिक संबंध तर ठेवलेच शिवाय घरातले सर्व काम करुन घेतले. ती साफ सफाई आणि जेवण बनविण्याचे काम करायची नंतर उरलेल्या वेळेत टीव्ही पाहायची. वडीलांच्या वयाच्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास ती नाखूश होती. आणि ही तात्पुरते निकाह लवकर संपावा अशीच तिची इच्छा होती.

लग्न पाच दिवस टीकले. त्यानंतर तो पर्यटक सौदीला निघून गेला आणि तेथून तीन वेळा तलाक बोलून त्याने लग्न मोडून टाकले.कहाया हीने आपल्या पहिल्या कॉन्ट्रक्ट नवऱ्याला तिचे खरे नाव कधीच सांगितले नाही. हे तिचे पहिले कॉन्ट्रक्ट मॅरेज होते. त्यानंतर तिच्या इतक्या वेळा कॉन्ट्र्क्ट लग्न झालीत की तिलाच आता आठवत नाहीत. ती म्हणते की कदाचिच 15 वेळा लग्न झाले असेल. सर्व पुरुष मध्य- पूर्व देशातीलच होते. टुरिस्ट बनून इंडोनेशियात आलेले होते. हे माझ्यासाठी छळवणूकी पेक्षा कमी नाही. जेव्हा माझे लग्न लावून दिले जात होते तेव्हा मला येथून घरी कधी जायला मिळणार हाच सवाल माझ्या मनात यायचा असे कहाया म्हणते.

निकाह मुताह…

निकाह मुताह…म्हणजे मजेसाठी केलेले लग्न ( Pleasure Marriage), इस्लाममधील वादग्रस्त कंत्राटी लग्न असून ते इंडोनेशियातील PUNCAK हा डोंगराळ भागात प्रचलित झाले आहे. येथील भागाला लोक आता घटस्फोटीत महिलांचे (divorcee villages) गाव असे म्हणू लागले आहेत. कहायाच्या मते एक हजार लोकसंख्येच्या या गावात ती सात महिलांना ओळखते ज्यांना अर्थाजनासाठी अशा लग्नाचा एक भाग व्हावे लागते. मुस्लीम बहुल देश इंडोनेशियाच्या कायद्यानुसार खरे तर वेश्यावृत्ती बेकायदेशीर आहे. तसेच निकाह मुताह सारख्या कंत्राटी लग्नांवर ही बंदी आहे. परंतू कायदा केवळ कागदावर आहे.हा आता येथील व्यवसाय बनला आहे.

थायलंडनंतर आता..

अनेक वर्षांपूर्वी मध्य-पूर्वेतून मजेसाठी येणाऱ्या पर्यटकांना थायलंड मुख्य आकर्षणाचे केंद्र होते. परंतू 1980 च्या दशकात ट्रेंड बदलला जेव्हा सौदी आणि थायलंडच्या नात्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर थायलंडच्या ऐवजी सौदीतील पर्यटक आता थायलंड ऐवजी इंडोनेशियाला जात आहेत. येथील 87 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. मुस्लीम लोकसंख्येमुळे सौदी येथील नागरिकांना थायलंड पेक्षा इंडोनेशिया अधिक सोयीचं पडू लागले आहे. PUNCAK येथील लोकांनी आता पर्यटकांच्या मागणीसाठी खास रेस्टॉरंट देखील उघडले आहेत. PUNCAK येथील कोटा बंगा हा परिसर असा कंत्राटी लग्नासाठी प्रसिद्ध झाला आहे.

महिन्याला 25 कंत्राटी लग्नं

इंडोनेशियातील अनेक शहरांमध्ये ही प्रथा खूप लोकप्रिय आहे, जिथे बेरोजगारी आहे. उत्पन्नाचे अन्य साधन नाही तेथे हा व्यवसाय सुरु आहे.कोविड साथीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे असे जकार्ता येथील शरीफ हिदायतुल्ला इस्लामिक स्टेट युनिव्हर्सिटीमधील इस्लामिक कौटुंबिक कायद्याचे प्राध्यापक यायान सोपयान यांनी लॉस एंजेलिस टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.काही एजंट महिन्याला 25 कंत्राटी विवाह लावून देत असून कधी -कधी त्यांना हुंड्यातील 10 टक्के रक्कम कमिशन म्हणून मिळत असते.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.