दहशतवादाविरोधात एकत्र लढणार, ‘क्वाड’मध्ये नाव न घेता पाकिस्तानला सुनावले
भारत पुढील वर्षी क्वाड समिटचे आयोजन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. पुढील वर्षी आपल्या देशात क्वाड समिट आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होईल असं मतही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
हिरोशिमा : जपानमधील हिरोशिमामध्ये आज क्वाड देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. यावेळी वेगवेगळ्या कारवाईत गुंतलेल्या देशाना या क्वाड देशांच्या बैठकीत थेट सुनावण्यात आले आहे. या बैठकीमध्ये भारतासह सर्व चार देशांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे. क्वाड देशांच्या या बैठकीत सीमावाद, दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत अशा देशांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या बैठकीत सहभागी झालेल्या राष्ट्रीय प्रमुखांनी सांगितले की, आम्ही सीमेपलिकडे असलेला दहशतवादी कारवाया आणि हिंसक कारवायाविरोधात आम्ही निषेध व्यक्त करत आहोत.
दहशतवादाविरोधात आम्ही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही यामधील राष्ट्रांनी सांगितले.
क्वाड परिषदेतील प्रमुखांनी सांगितले की आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत दहशतवादासारख्या कारवायांना रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी एकत्र काम करणार आहोत.
PM @narendramodi joined PM @AlboMP of Australia, PM @kishida230 of Japan and President @JoeBiden of USA @POTUS for the 3rd in-person Quad Leaders’ Summit.
Leaders reviewed efforts to address Indo-Pacific’s priorities on health security, climate change, critical and emerging… pic.twitter.com/8wvg7BBki7
— Arindam Bagchi (@MEAIndia) May 20, 2023
तर सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. क्वाडचे सर्व देश दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारीही ठरवणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
मुंबई 26/11 आणि पठाणकोट सारख्या मोठ्या हल्ल्यांसह भारतातील सर्व दहशतवादी हल्ल्यांचा क्वाड परिषदेतील देशांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे सहभागी देशांनी सांगितले की यावर्षी मार्च 2023 मध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती. यादरम्यान दहशतवादाविरुद्ध नवीन कार्यगटाची घोषणा करण्यात आली आहे.
क्वाड देशांच्या नेत्यांनीही चीनला सडेतोड उत्तर दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या कुरघोड्या आणि विस्तारवादी भूमिकेमुळेच लोकशाही मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारत पुढील वर्षी क्वाड समिटचे आयोजन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. पुढील वर्षी आपल्या देशात क्वाड समिट आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होईल असं मतही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.