राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा

ओबामा यांनी मनमोहन सिंग यांचे वर्णन ' निर्विकार प्रामाणिकपणा असलेली व्यक्ती' असे केले आहे. | Barack Obama A Promised Land

राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 7:53 AM

वॉशिंग्टन: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते, अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी केली आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी मांडले. (Barack Obama express his view about Manmohan Singh and Rahul Gandhi)

बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये या पुस्तकाचे परीक्षण छापून आले होते. या परीक्षणात ओबामा यांच्या पुस्तकातील अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख आहे. ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भेट घेतलेल्या जागतिक नेत्यांविषयीचे अनुभव कथन केले आहेत.

यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. ओबामा यांनी मनमोहन सिंग यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांचे वर्णन ‘ निर्विकार प्रामाणिकपणा असलेली व्यक्ती’ असे केले आहे. बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी गुरूशरण कौर यांची अमेरिकेत भेट घेतली होती. यावेळी ओबामा दाम्पत्याकडून मनमोहन सिंग आणि त्यांची गुरूशरण कौर यांच्यासाठी खास मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते.

A Promised Land या पुस्तकात बराक ओबामा यांनी इतर जागतिक नेत्यांविषयीही भाष्य केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची शारीरिक तंदुरुस्ती वाखाणण्याजोगी आहे, अशी मोघम टिप्पणी बराक ओबामा यांनी केली आहे. तर अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडने (Joe Biden) हे एक सभ्य, प्रामाणिक आणि निष्ठावान व्यक्ती असल्याचे बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

बायडेन यांच्यासाठी ओबामांची ‘फोन पे चर्चा’, माजी राष्ट्राध्यक्षांनी आठ महिन्यांच्या बाळाची विचारपूस केल्यानं आईही भारावली

जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते आपलं काय संरक्षण करणार, ओबामांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र

VIDEO: बराक ओबामांवर ही वेळ का आली ?

(Barack Obama express his view about Manmohan Singh and Rahul Gandhi)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.