सीरियात बंडखोरांनी सत्तापालट केल्याचा दावा, राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देशातून परांगदा; प्लेनही रडारवरुन गायब
सिरीयात अनेक दिवसांपासून गृहयुद्ध सुरुच आहे. बंडखोरांनी होम्सवर कब्जा कायम ठेवला आहे. या भागातून असदचे सैनिक केव्हाच पळून गेले आहेत. त्यामुळे बंडखोरांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी मागे वळून न पाहाता आपले युद्ध सुरुच ठेवले आहे.
सिरीयात बंडखोर गटाने राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद शासन उलथवून टाकल्याचा दावा केलेला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बंडखोरांना राजधानी दमिश्क यात घुसखोरी केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी देश सोडला आहे. आणि ते अज्ञात स्थळी पळून गेलेले आहे असे म्हटले जात आहे.राष्ट्राध्यक्ष असद यांनी रशिया किंवा तेहराण येथे आसरा घेतला असल्याचे म्हटला जात आहे. परंतू अधिकृतरित्या कोणतीही बातमी आलेली नाही.
रशियाच्या कार्गो विमानाने सिरीयाहून निघालेले राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे विमान रडारवरुन गायब झालेले आहे. त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. सिरीयाचे पंतप्रधान मोहम्मद गाझी जलाली यांनी आपल्या घरातून एक व्हिडीओ शेअर करीत आपण देशातच राहून सत्तेच्या सुरळीत हस्तांतरणासाठी काम करु असे म्हटले आहे.
सिरीयाच्या लोकांना एकजूट दाखवावी – बंडखोर गट
सिरीयावर ताबा घेतल्याचा दावा बंडखोरांच्या गटाने केलेला आहे. राष्ट्राध्यक्ष असद यांचे बंधू माहेर अल-असद हे देखील पळून गेले आहे. राजधानी दमिश्क येथे चारी बाजूंनी बंडखोर घुसले आहेत. राष्ट्रपती भवनाजवळ तुंबळ युद्ध सुरु आहे. दमिश्क इंटरनॅशनल विमानतळावर देखील बंडखोरांनी ताबा घेतला आहे. सैन्य दलाचे मुख्यालय देखील बंडखोरांच्या ताब्यात आहे. बंडखोरांना अमेरिका आणि तुर्कस्थानचा पाठींबा मिळालेला आहे.
असद सरकारचा अंत झालेला आहे. असद देश सोडून पळालेले आहेत. असदचे लष्कर दमिश्क येथून पळाले आहे. सिरीयातील लोकांनी एकजूट दाखवावी. आता या देशावर कोणा एकाचे वर्चस्व राहणार नाही असे बंडखोरांनी म्हटले आहे.सिरीयन सैनिकांना राष्ट्राध्यक्षच पळून गेल्याने भीतीने गणवेश सोडून साधे कपडे परिधान केले आहेत.
कैद्याने तुरंगातून मुक्त केले
दमिश्क येथे सेनेच्या गोळीबारात दोन जण ठार झालेले आहेत. हे लोक बशर सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. डौमा येथे असदच्या सैन्याने दोघांना ठार केले आहे.एकीकडे बंडखोरांनी कब्जा केल्याचा दावा केला असताना असदच्या सैनिकांना आपला हत्यार डिपो उडवला आहे. बंडखोरांनी सेडनाया जेलमधून अनेक कैद्यांना तुरुंगातून मुक्त केले आहे.