डोनाल्ड ट्रम्पना हटवलं जाऊ शकतं का? कसे? वाचा ‘अमेरिकन यादवीतली’ मोठी बातमी
अमेरिकेत खबळब उडाली असून ट्रम्प यांच्याविरोधात जनमत तयार होत आहे. त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन लवकरात लवकर हटवावे अशी मागणी केली जातेय. (Donald Trump American constitution)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (president Donald Trump) यांच्या समर्थाकांनी अमेरिकन संसद कॅपिटल हिलवर प्रचंड धुडगूस घातल्यानंतर जगभरातून ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांचे कट्टर समर्थक एशली बेबबिट यांचादेखील मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेमुळे सध्या अमेरिकेत खबळब उडाली असून ट्रम्प यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. या यादवीला प्रत्युत्तर म्हणून त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन लवकरात लवकर हटवावे अशी मागणी केली जातेय. (removal of president Donald Trump and 25th amendment in American constitution)
ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन हटवले जाऊ शकते?
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत. असे असले तरी सुरुवातीला ट्रम्प यांनी जो बायडेन (Joe Biden) यांनी ही निवडणूक चुकीच्या पद्धतीने जिंकल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्यांनतर काल ( 7 जानेवारी) अमेरिकन संसदेने जो बायडेन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. असे असले तरी अमेरिकन संसद कॅपिटल हिल भवनामध्ये (US Capitol) झालेले प्रदर्शन लक्षात घेता ट्रम्प यांना अध्यक्षपदावरुन दूर करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी अमेरिकन संविधानाच्या 25 व्या दुरुस्तीचा आधार घ्यावा अशी मागणी केली जात आहे. या 25 व्या दुरुस्तीनुसार (25th amendment in American constitution) ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन दूर करता येऊ शकते.
अमेरिकन संविधानाची 25 वी दुरुस्ती काय आहे?
संविधानातील 25 व्या दुरुस्तीनुसार अमेरिकेच्या अध्यक्षांना त्यांच्या पदापासून दूर करता येऊ शकते. 1967 साली ही घटना दुरुस्ती केली गेली हेती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी (John F. Kennedy) यांची हत्या झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा उत्तराधिकारी नियुक्त करण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. या दुरुस्तीमध्ये कुठली व्यक्ती अमेरिकन अध्यक्षपदासाठी योग्य नाही याचीसुद्धा नोंद केली होती. याच नोंदीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदापासून दूर करता येऊ शकते.
अमेरिका संविधानाची 25 वी दुरुस्ती
या संविधान दुरुस्तीनुसार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष शारीरिक आणि मानसिकरीत्या तंदुरुस्त नसेल तर त्याला त्याच्या पदावरुन हटवले जाऊ शकते, अशी तरतूद करण्यात आली आहे. या घटनादुरुस्तीअंतर्गत एकूण 4 नव्या कलमांचा समावेश केलेला होता.
कलम 1 : काही कारणांमुळे किंवा अध्यक्षांचा अकस्मात मृत्यू किंवा अध्यक्षांनी राजीनामा देणे, अशी परिस्थिती उद्भवल्यास अशा वेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून देशाचा कारभार सांभाळतील.
कलम 2 : या कलमांतर्गत उपराष्ट्राध्यक्षपद रिकामे असेल, तर राष्ट्राध्यक्ष या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करु शकतात. त्यासाठी अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सदनांमध्ये बहुमत मिळणे आवश्यक आहे.
कलम 3 : या कलमामध्ये सत्तेच्या हस्तांतरणाबद्दल सांगितलेलं आहे. देशाचा राष्ट्र्राध्यक्ष जर त्याची अयोग्यता किंवा असक्षमता जाहीर करण्यास सक्षम नसेल तर देशाचे उपराष्ट्राध्यक्ष हे राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार सांभाळतील.
कलम 4 : अमेरिकन संसदेच्या 25 व्या घटनादुरुस्तीमधील कलम 4 सर्वांत महत्त्वाचे आहे. या कलमांतर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सत्ता हस्तांतरण प्रक्रिया करण्यास तसेच त्यांची भूमिका निभावण्यास अक्षम असतील तर त्यांना त्यांच्या पदापासून दूर केलं जाऊ शकतं. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या पदावरुन हटवण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळाने ठरावावर हस्तक्षर करणे गरजेचे आहे. तसेच, हा ठराव मांडल्यानंतर त्याला दोन तृतीयांश बहुमत मिळणे गरजेचे आहे.
अमेरिकन संविधानाच्या 25 व्या दुरुस्तीतील कलम 4 नुसार डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदापासून दूर केले जावे अशी मागणी केली जात आहे. मुख्यत: ट्रम्प विरोधक आणि देशातील वैचारिक नागरिक यांच्याकडून ही मागणी केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेतील तणाव पाहता तेथे आगामी 15 दिवस महत्त्वाचे असून संसदेवरील हल्ला हा देशासाठी अपमानास्पद असल्याचे अमेरिकन नागरिकांकडून सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या :
स्पेशल रिपोर्ट: अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का?
(removal of president Donald Trump and 25th amendment in American constitution)