चुका सुधारण्यासाठी या पदावर आलो; ऋषी सुनक यांच्या निवडीनंतरचे हे महत्वाचे 10 मुद्दे
चुका सुधारण्यासाठी मी पंतप्रधान झालो आहे. गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे माझे ध्येय आहे असं ऋषी सुनक सांगतात.
नवी दिल्लीः भारतीय वंशाचे असेलेल ऋषी सुनक (Rushi Sunak) यांनी एक वेगळा इतिहास रचला आहे. भारतीय वंशाचे ते पहिले ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत. तर ब्रिटनचे माजी अर्थमंत्री असलेले 42 वर्षीय सुनक हे हिंदू असून ते गेल्या 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांना गणले जात आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान (British Prime Minister) झाल्यानंतर सुनक यांनी सांगितले की, आर्थिक स्थैर्य आणणे ही माझी प्राथमिकता असून ब्रिटनच्या भल्यासाठीच काम करणार आहे.
1. चुका सुधारण्यासाठी मी पंतप्रधान झालो आहे. गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे माझे ध्येय आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि महामारीमुळे आपला देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
2.अर्थव्यवस्था हाताळण्याचे सुनक यांच्यासमोर आव्हान आहे. यूक्रेनमध्ये चलनवाढ 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आयएमएसने पुढील वर्षासाठी यूकेच्या वाढीचा अंदाज फक्त 0.3 टक्के ठेवला आहे.
3. यासोबतच देशाला ऊर्जा संकटातून बाहेर काढण्याचे आव्हानही त्यांच्यासमोह आहे. युक्रेनमध्ये युद्धानंतरचे निर्माण झालेले ऊर्जा संकट कायम राहिले आहे.त्यामुळे यूकेमध्ये ऊर्जेच्या किंमती 3 पट वाढल्या आहेत.
4. त्याचबरोबर आपल्या पक्षाची एकजूट करणे हेही आव्हान त्यांच्यासमोर आहे. सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाची लोकप्रियताही सातत्याने घसरत आहे.
5. कंझर्व्हेटिव्ह पक्षाची लोकप्रियता 14 टक्क्यापर्यंत कमी झाली आहे. 3 वर्षात पक्षाने 3 पंतप्रधान केले. त्यामुळे कंझर्व्हेटिव्ह पक्षातील गटबाजी शिगेला पोहोचली आहे.
6.याआधी लिझ ट्रस यांना अवघ्या 45 दिवसांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या खराब आर्थिक धोरणामुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. कंझर्व्हेटिव्ह पक्षातही त्यांच्या विरोधात आवाज उठवला गेला होता.
7. सुनक यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 357 खासदारांपैकी निम्म्याहून अधिक खासदारांचा पाठिंबा होता, तर नेता होण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना किमान 100 खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता.
8.ऋषी सुनक यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करून जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास ते उत्सुक आहेत.
9. सुनक यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये यॉर्कशायरमधील रिचमंडची जागा जिंकून झाली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये साजिद जाविद यांनी राजीनामा दिला तेव्हा अर्थ मंत्रालयातील कनिष्ठ पदापासून ते अर्थमंत्री पदापर्यंत पोहोचले.
10.देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी मी व्यावसायिक पद्धतीने काम करणार आहे. त्यामुळे मी दिलेल्या वचनपूर्तीसाठी रात्रंदिवस राबणार असल्याचेही त्यांनी सांगितले.