Next PM Rishi Sunak : त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं, आता भारतीयाला संधी? पहिल्या राऊंडमध्ये ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं

ब्रिटनमध्ये (Britain) पंतप्रधानपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय वंशांच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. बुधवारी एलिमिनेशन फेरीसाठी मतदान झाले. यामध्ये सुनक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.

Next PM Rishi Sunak : त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं, आता भारतीयाला संधी? पहिल्या राऊंडमध्ये ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 7:22 AM

ब्रिटनमध्ये (Britain) पंतप्रधानपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय वंशांच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. बुधवारी एलिमिनेशन फेरीसाठी मतदान झाले. यामध्ये सुनक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधापदासाठी इच्छूक आहेत. एलिमिनेशन फेरीत सुनक यांना एकूण 88 एवढे मतं पडली. या मताची टक्केवारी 25 टक्के एवढी आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या पंतप्रधानपदाच्या आणखी एक प्रमुख दावेदार पेनी मॉर्डंट (Penny Mordant)यांना 19 टक्के म्हणजेच 67 मतं मिळाली. या शर्यतीत लिझ ट्रॉस हे 14 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना एकूण 50 मते मिळाली. केमी बेदनोक यांना एकूण 40 मते मिळाली असून, ते चौथ्या स्थानावर आहेत. तर टॉम टुजेंट 37 मतांसह पाचव्या स्थानावर आणि सुएला ब्रेव्हरमन या 9 टक्के मतांसह सहाव्या क्रमांकावर आहेत, त्यांना एकूण 32 मतं मिळाली आहे. एलिमिनेश फेरीत आघाडीवर असलेल्या सुनक यांच्यापुढे आता पक्षातील खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान असणार आहे. तर या फेरीत नधीम जहावी आणि जर्मी हंट हे बाहेर झाले आहेत.

तीन फेऱ्यांच्या माध्यमातून नेत्याची निवड

ऋषी सुनक यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे आपल्या पक्षातील खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचे. सुनक हे सध्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. या पक्षात नेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना केली जाते. या समितीमध्ये पक्षाचे खासदार असतात. नॉमिनेशन, एलिमिनेशन आणि फायनल सिलेक्शन अशा तीन मार्गाने या पक्षात नेत्याची निवड केली जाते. यामध्ये सुनक यांचे नॉमिनेशन झाले आहे. एलिमिनेशन राऊंड सध्या सुरू आहे. या फेरीत ऋषी सुनक हे सध्या आघाडीवर आहेत. या फेरीसाठी एकूण आठ उमेदवार होते. त्यातील दोघांना कमी मते मिळाल्याने ते बाहेर पडले आहेत. आता लढत ऋषी सुनक, पेनी मॉर्डंट, लिझ ट्रॉस, केमी बेदनोक, टॉम टुजेंट आणि सुएला ब्रेव्हरमन या सहा जणांमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

तीसपेक्षा कमी मतं मिळाल्यास एलिमिनेशन

सध्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधापदासाठीच्या एलिमिनेशन फेरीला सुरुवात झाली आहे. ज्या उमेदवाराला या फेरील तीसपेक्षा कमी मत पडतील तो उमेदवार या फेरीतून बाद होतो. ब्रिटनच्या राज्यघटनेनुसार असाच उमेदवार पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, ज्याच्याकडे कमीत कमी तीस खासदारांचे समर्थन आहे. सध्या तरी या स्पर्धेमध्ये ऋषी सुनक हे आघाडीवर आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.