दिवसाढवळ्या पाकिस्तानच्या संसदेत ‘दरोडा’? ; पण चोरून चोरून चोरलं काय?, संरक्षण मंत्र्यांनी घेतले डोके झोडून

Pakistan Assembly Robbery : जागतिक पातळीवर पाकिस्तानचे नाक कापल्या गेले. पाकिस्तानच्या संसदेत दिवसाढवळ्या दरोडा पडला. या दरोड्याने पाकिस्तानची उरलीसुरली लाज पण गुंडाळल्या गेली. त्यामुळे नॅशनल असेम्बलीच्या अध्यक्षांनी डोके झोडून घेतले तर संरक्षण मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. काय आहे हा प्रकार, नेमकं काय गेलंय चोरीला...

दिवसाढवळ्या पाकिस्तानच्या संसदेत 'दरोडा'? ; पण चोरून चोरून चोरलं काय?, संरक्षण मंत्र्यांनी घेतले डोके झोडून
पाकिस्तान संसदेत दिवसाढवळ्या दरोडा
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 10:08 AM

पाकिस्तानच्या संसदेत दरोडा पडला आहे. हो तो पण दिवसाढवळ्या. या दरोड्याची पाकिस्तानच्या जनतेत खमंग चर्चा आहे. तुम्ही म्हणाल दरोडा पडल्याची खमंग चर्चा कशी? कारण या दरोड्याची पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीच्या अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. पाकिस्तान जगात आता भिकाऱ्यांचा देश म्हणून ओळखल्या जाऊ लागला आहे. देशात लूटमार आणि चोरी-दरोड्याचे प्रकार दिवसागणिक वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. चोरांची हिम्मत इतकी वाढली आहे की त्यांनी थेट संसदेतच दरोडा घातला आहे.

चोरी तरी काय केले

आता तुम्ही म्हणाल चोरी तरी काय गेले. तर पाकिस्तान हा भुरट्या चोरांचा देश म्हणून पण ओळखल्या जातो. या भुरट्या चोरांनी थेट पाकिस्तानच्या संसदेवर मोर्चा वळवला. त्यांनी नॅशनल असेम्बलीच्या सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत खासदारांचे चप्पल, बुट, शूज लांबवले. या घटनेने एकच खळबळ उडाली. जिथं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना खासदारांच्या चप्पल, बुट सुरक्षित नाही तिथं सर्वसामान्य जनतेचे काय हाल, अशी प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहे. या घटनेने संरक्षण मंत्र्यांनी डोके झोडून घेतले तर पाकिस्तान नॅशनल असेम्बलीच्या अध्यक्षांनी या चोरीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

नेमकं घडलं तरी काय

नॅशनल असेम्बली परिसरात नमाज अदा करण्यासाठी एक मशीद बांधण्यात आलेली आहे. शुक्रवारी नमाज पठणासाठी खासदार, कर्मचारी, अधिकारी मशिदीत गेले. त्यानंतर ते बाहेर आल्यावर मशीद परिसरातील 20 हून अधिक चप्पल, बुट, शूज गायब झाले होते. अनेक मंत्री-संत्र्यांचे पादत्राणं चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली. तर सुरक्षा कर्मचारी या घटनेने पाणी पाणी झाले.

चौकशीचे दिले आदेश

इस्लामाबाद येथील प्रसिद्ध पत्रकार आणि एंकर तंजीला मजहर हिला या घटनेवर तिचे मिश्किल हास्य लपविता आले नाही. तीने भारतीय मीडियाशी, बोलताना या प्रकरणी नॅशनल असेम्बलीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली. खासदारांनी या घटनेने आपल्याला लाज वाटत असल्याचे आणि राग अनावर होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. संसदेसारख्या परिसरातून चप्पल आणि बुट चोरीला गेल्याने सर्वांनीच संताप व्यक्त केला आहे. आता हा परिसर पण सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया ज्यांचे चप्पल, बुट चोरीला गेले, त्या खासदारांनी दिल्याचे समोर येत आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

चोरीच्या घटनेची अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावला. तर संरक्षण मंत्र्यांनी देशात भिकाऱ्यांची संख्या आणि चोरीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. आता संसद परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोराला पकडण्यात येणार असल्याचे समजते. कोणीतरी मुद्दाम हा प्रकार केल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.