Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही!

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim corona) कोरोनाने मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा नाही.

Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही!
Follow us
| Updated on: Jun 06, 2020 | 2:03 PM

लाहोर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim corona) कोरोनाने मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण याबाबतचे अंदाज वर्तवत आहेत, मात्र सरकारने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. अनेक सोशल साईट्सवर दाऊदच्या मृत्यूचं वृत्त पसरलं आहे, मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम  आणि त्याची पत्नी महजबीन (Mahzabeen) ‘कोरोना’ची लागण झाल्याचे वृत्त कालच सर्वत्र आलं होतं. पाकिस्तानमधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले जात होतं. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं या वृत्ताद्वारे सांगण्यात आलं. मात्र आज त्याच्या मृत्यूची अफवा पसरली आहे.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संसर्गाने पाकिस्तानातही पाय पसरले आहेत. कोरोनाची लागण दाऊदच्या सुरक्षा रक्षकांना आणि त्यानंतर दाऊद आणि त्याच्या पत्नीलाही झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे दाऊदला कराचीतील मिलिट्री रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मीडियात पसरली.

दाऊद इब्राहिम कोण?

गुन्हेगारी विश्वाचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबई आणि परिसरात अनेक गुन्ह्यांची मालिका उघडली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.

दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरीचा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो.  भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील भूमिकेबद्दल त्याच्यावर 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.

दाऊद आपल्या देशात नसल्याचं सांगत पाकिस्तानने अनेक वेळा हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल. (Dawood Ibrahim positive coronavirus)

संबंधित बातम्या 

दाऊद इब्राहिमला ‘कोरोना’, कराचीत लष्करी रुग्णालयात उपचार

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.