जर खरोखरंच पुतिननं यूक्रेनवर अणूबाँब टाकला तर काय काय होऊ शकतं? किती राखरांगोळी होईल?
रशिया यूक्रेनमधील एखाद्या शहरावर अणवस्त्र टाकल्यास ते शहराचा पूर्णपणे विनाश करेल. यातून पुढे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल, अणवस्त्र युद्धाला सुरुवात झाल्यास तो जगाची वाटचाल विनाशाकडे होईल, असं तज्ज्ञांना वाटतं.
नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलंय. एकीकडे रशिया आणि यूक्रेन यांची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे चर्चेसाठी पुढाकार घेतलेल्या बेलारुसनं त्यांच्या देशात रशियाला अणवस्त्र (Nuclear Weapon) तैनात करण्यास परवानगी दिलेली आहे. बेलारुसच्या या भूमिकेनं तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार का हे पाहावं लागणार आहे. रशियानं आता अणवस्त्र युद्धाची तयारी सुरु केलीय. रशिया आता बेलारुसमध्ये अणवस्त्र तैनात करु शकतो. रशियानं त्यांच्या डिटरन्स फोर्सला तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. रशिया यूक्रेनमधील एखाद्या शहरावर अणवस्त्र टाकल्यास ते शहराचा पूर्णपणे विनाश करेल. यातून पुढे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल, अणवस्त्र युद्धाला सुरुवात झाल्यास तो जगाची वाटचाल विनाशाकडे होईल, असं तज्ज्ञांना वाटतं.
रशियानं अणवस्त्र टाकल्यास काय होईल?
तज्ज्ञांच्या मते रशियानं समजा 30 किलो टनचा अणूबॉम्ब टाकल्यास 4 किलोमीटर परिसर पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. जर, यूक्रेननं 1 हजार किलोटनचा बॉम्ब टाकल्यास त्याचा परिणाम 100 किलोमीटरच्या परिघातील भूभागातील सर्व काही नष्ट होईल. अमेरिकेनं हिरोशिमा मध्ये 15 किलो टन आणि नागासाकीमध्ये 20 किलोटन वजनाचा अणूबॉम्ब टाकला होता. त्यामुळं ती शहर उद्धवस्त झाली होती. आता रशियानं अणवस्त्राचा वापर केल्यास तो यूरोपच्या विनाशाची नांदी ठरु शकतो.
रशियाकडे किती अणवस्त्र
आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकारांच्या माहितीनुसार रशियाकडे फादर ऑफ बॉम्ब आहे. जर रशियानं त्याचा वापर केल्यास युरोपचं नाही तर पूर्ण जग उद्धवस्त होऊ शकतं. पुतिन यांना त्यांच्या अणवस्त्रांची क्षमता माहिती आहे. यामुळं ते वारंवार अणवस्त्र वापरण्याची धमकी देत आहेत. रशियाकडे सद्यस्थितीत 4477 अणवस्त्र आहेत. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या ताज्या अहवालानुसार 4477 अणवस्त्रांपैकी 2565 स्ट्रॅटेजिक आणि 1912 नॉन स्ट्रॅटेजिक अणवस्त्र आहेत.
जेव्हा अमेरिकेनं हिरोशिमावर अणवस्त्र टाकलेलं पाहा व्हिडीओ
रशियन डिटरन्स फोर्सचा सराव सुरु
#BREAKING | Russian nuclear triad takes up standby alert duty with reinforced staff, Shoigu tells Putinhttps://t.co/sFPMpCvBDj pic.twitter.com/8rQA1rA1kM
— Sputnik (@SputnikInt) February 28, 2022
रशिया आणि युक्रेन यांच्यातील आजचा युद्धाचा पाचवा दिवस आहे. 24 फेब्रुवारीला सुरु झालेलं युद्ध आता विनाशकारी अणवस्त्रांच्या वापरावर येऊन पोहोचलंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी न्यूक्लिअर डिटरंट फोर्सला अलर्टला आदेश दिला आहे.
न्यूक्लिअर डिटरंट फोर्स म्हणजे काय?
न्यक्लिअर डिटरंट फोर्स ही अणवस्त्रांच्या हल्ल्यापासून वाचवणारी तुकडी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरु झालेल्या शीतयुद्धात न्यूक्लिअर डिटरन्स थेअरी समोर आली होती. अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरु असताना अमेरिकेनं पहिल्यांदा न्यूक्लिअर डिटरंट फोर्स तयारी केली होती.