नवी दिल्ली :यूक्रेनच्या (Ukraine) नाटोमधील समावेशाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेल्या रशियानं (Russia) युद्ध पुकारलं आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत आता राजधानी कीव शहरापर्यंत धडक मारली आहे. रशिया यूक्रेनच्या संघर्षात मोठं नुकसान होत असून जीवितहानी देखील होत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान एक भावूक करणारी घटना समोर आली आहे युक्रेनच्या स्नेक आयलँड (Snake Islands) वरील ही घटना आहे रशिया समोर शरण येण्यास नकार देणाऱ्या 13 सैनिकांचा हत्या करून रशियाने त्या बेटावर कब्जा मिळवला आहे रशियाने युक्रेन च्या सैनिकांना शरण येण्यास सांगितलं होतं त्यानंतर रशियाच्या सैन्याला युक्रेनचा त्या तेरा बॉर्डर गार्डन नकार दिला यानंतर रशियाने त्या जवानांची हत्या केली युक्रेनच्या त्या तेरा सैनिकांच्या शौर्यासाठी युक्रेन युक्रेन या किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे
A group of Ukrainian border guards were stationed on Snake Island, in the Black Sea south of Odessa, when a Russian warship ordered them to surrender under threat of attack.
Their response: “Russian warship, go fuck yourself.”
They held their ground. All 13 were killed. pic.twitter.com/GMRsXQRSX0
— Alejandro Alvarez (@aletweetsnews) February 25, 2022
Snake Island ला Zmiinyi Island या नावावं देखील ओळखलं जातं. हे बेट ओडेसाशाच्या दक्षिणेला काळ्या समुद्रात आहे. रशियाच्या सैनिकांनी तिथं पोहोचून प्रथम यूक्रेनच्या 13 बॉर्डर गार्डसला धमकी देत शरण येण्यास सांगितलं. यूक्रेनच्या तिथं उपस्थित असलेल्या सैन्यानं रशियाच्या जवानांना शिवीसह प्रत्युत्तर दिलं आणि शरण येण्यास नकार दिला. यानंतर रशियानं त्यांना मारून टाकंल आहे.
यूक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्विट करून स्नेक आयलँडवरील बेटावर रशियासमोर शरण न जाणाऱ्या 13 बॉर्डर गार्डसचा सन्मान केला आहे.13 सैनिकांनी रशियासमोर न जाण्याचा निर्णय घेतला त्यांना Hero Of Ukraine या किताबानं गौरवण्यात आलं आहे.
यूक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरांवर कब्जा मिळवण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरु आहेत. काळ्या समूद्राजवळील ओडेस्साजवळ टँक दिसत आहेत. रशियानं कीववर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. रशियाचे प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी यूक्रेननं नवीन डाव खेळलाय. यूक्रेनच्या आर्मीनं एक पूल उडवून दिला आहे. त्यामुळं रशियाचं सैन्य कीवमध्ये पोहोचण्यास अडचणी निर्माण होतील. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना पहिल्या दिवशी तोंड दिल्यानंतर यूक्रेननं देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवातकेलीय. राजधानी कीवमध्ये भीषण लढाई होण्याची शक्यता आहे. यूक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून आक्रमक प्रतिहल्ले केले जात आहेत. यूक्रेनकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार सात एअरक्राफ्ट पाडले आहेत. हल्ले प्रतिहल्ल्यांनी कीव हादरुन गेलंय. रशियाचे 800 सैनिक मारले गेल्याचा दावा यूक्रेनकडून करण्यात आलाय. तर, रशियाचे 7 फायटर जेट, 30 टँक आणि 6 हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आली आहेत.
इतर बातम्या:
Fact check : Russia Ukraine युद्धादरम्यान Fake photo आणि Videosचं फुटलं पेव! जाणून घ्या सत्य