Russia Ukraine Crisis : यूक्रेनमध्ये सत्तापालट? सत्ता तुमच्या हातात घ्या, ब्लादिमीर पुतिन यांचं यूक्रेनच्या सैन्याला आवाहन
ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये सत्तापालटाचे संकेत दिले आहेत. पुतिन यांनी यूक्रेनच्या सैन्याला देशाची सत्ता हातात घेण्याचं आवाहन केलं आहे. रशियाने एक दिवस आधी यूक्रेनवर हल्ला चढवला आता या दोन्ही देशात भीषण युद्ध सुरु झाल्यानंतर पुतिन यांचं हे वक्तव्य आलं आहे.
मुंबई : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये (Ukraine) सत्तापालटाचे संकेत दिले आहेत. पुतिन यांनी यूक्रेनच्या सैन्याला (Ukrainian Military) देशाची सत्ता हातात घेण्याचं आवाहन केलं आहे. रशियाने (Russia) एक दिवस आधी यूक्रेनवर हल्ला चढवला आता या दोन्ही देशात भीषण युद्ध सुरु झाल्यानंतर पुतिन यांचं हे वक्तव्य आलं आहे. रशियाचे सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरावर चाल करुन जात आहेत. रशियन सैन्याने कीव बाहेरील एका यूक्रेनी विमातळावर कब्जा केलाय. अशावेळी भीती व्यक्त केली जातेय की कीव शहरावर रशियन सैन्य ताबा मिळवेल.
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी राजधानी कीवमधील विद्यमान सरकार हटवण्यास सांगितलं आहे. ‘मी पुन्हा एकदा यूक्रेनच्या सैन्यातील सैनिकांना आवाहन करतो. नव-नाझी आणि यूक्रेनी कट्टरपंथी राष्ट्रवाद्यांना आपली मुलं, बायका आणि वृद्धांना मानवी ढाल म्हणून वापर करु देऊ नका’, असं शुक्रवारी रशियाच्या सुरक्षा परिषदेत टीव्हीवर झालेल्या एका बैठकीत पुतिन म्हणाले. सत्ता तुमच्या हातात घ्या, त्यानंतर आपल्याला योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असंही पुतिन म्हणाले. तसंच यूक्रेनमध्ये रशियन सैन्य मोठी बहादुरी आणि शौर्य दाखवत आहेत, अशा शब्दात पुतिन यांनी रशियन सैन्याचं कौतुक केलं आहे.
Russian President Vladimir Putin to Ukrainian military- “Take power into your own hands”: Reuters pic.twitter.com/JYdqmNTm4t
— ANI (@ANI) February 25, 2022
शरणागतीशिवाय चर्चा नाही – पुतिन
शियाकडून यूक्रेनवर मोठा दबाव टाकला जात आहे. यूक्रेनमधील शहरं आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर आणि यूक्रेनच्या तिनही बाजुंनी सैन्य आणि टँक पाठवल्यानंतर आता रशियन सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरापर्यंत पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर यूक्रेनने आपली शस्त्रे टाकल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असं रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केलंय. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी सांगितलं की मॉस्को यूक्रेनसोबत चर्चेसाठी तेव्हाच तयार होईल, जेव्हा यूक्रेनचं सैन्य आपली शस्त्रास्त्रे टाकेल. त्याचबरोबर यूक्रेनवर नियो-नाझी यांचं राज्य असावं असं मॉस्कोला वाटत नसल्याचंही लावरोव यांनी म्हटलंय.
यूक्रेनच्या राष्ट्रपतींचं मदतीसाठी आवाहन
दरम्यान, पश्चिमी नेत्यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी त्यांचं लोकशाही पद्धतीने आलेलं सरकार पाडू शकेल, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवू शकेल असे रशियाचे हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केलं आहे.
Ukraine’s president Volodymyr Zelenskyy calls on Europeans with ‘combat experience’ to fight for Ukraine, reports AFP
(file photo) pic.twitter.com/qFdfOF81gu
— ANI (@ANI) February 25, 2022
इतर बातम्या :