Russia America : यूक्रेनच्या युद्धानं अमेरिकेंचं महासत्तापद संपवलं, आता रशिया हाच जगाचा दादा?
सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर त्याच्या जवळवपास छोट्या मोठ्या देशांची निर्मिती झाली. विघटनानंतर रशियाला मागे टाकत अमेरिका हाच जगाचा दादा म्हणून वावरत राहिला.
मुंबई : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका (America) आणि रशिया (Russia) हे दोन देश महासत्ता म्हणून उदयास आले. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्या शीतयुद्ध सुरु राहिलं. अमेरिकेनं सोव्हिएत रशियाचं विघटन करण्यात यश मिळवलं. सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर त्याच्या जवळवपास छोट्या मोठ्या देशांची निर्मिती झाली. विघटनानंतर रशियाला मागे टाकत अमेरिका हाच जगाचा दादा म्हणून वावरत राहिला. अमेरिकेनं इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लष्करी कारवाया केल्या. इराकमध्ये सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवून लावण्यात आली. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबानला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तानात लक्ष घातलं. अमेरिकेत सत्तांतर झाल्यावर गेल्या दीड वर्षात दोन महत्वाच्या घटना घडल्यात. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आलं तर आता यूक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यास रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी दिला. मात्र, त्यांचा इशारा धुडकावत रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. त्यामुळं यूक्रेनच्या युद्धानं अमेरिकेचं महासत्तापद संपवला, आता रशिया हाच जगाचा दादा? असा पोल टीव्ही 9 मराठीनं घेतला. या पोलवर मत नोंदवण्याऱ्या 57 टक्के दर्शकांनी रशियाच्या बाजूनं कौल दिला आहे.
यूक्रेनच्या नाटोमधील समावेशावर रशियानं आक्षेप घेतला होता. यूक्रेन नाटोमध्ये सहभागी झाल्यास नाटोच्या 30 देशांचं संयुक्त सैन्य रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल, ही भीती रशियाला वाटत होती. त्यामुळं यूक्रेनचा नाटोमध्ये समावेश होण्या अगोदरच रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलं. यूक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला निर्बंधांना सामोरं जावं लागले, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिला होता. मात्र, बायडन यांनी दिलेला इशारा धुडकावून लावत रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलं. मात्र, अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधाचा रशियावर फारसा फरक पडलेला दिसला नाही.
अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादण्याचा घेतलेला निर्णय
Today, I authorized a new round of sanctions and limitations in response to Putin’s war of choice against Ukraine.
We have purposefully designed these sanctions to maximize the long-term impact on Russia – and to minimize the impact on the United States. pic.twitter.com/wM0kEBcZba
— President Biden (@POTUS) February 25, 2022
अमेरिका आणि यूरोपियन देशांची संपत्ती जप्त करण्याचा रशियाचा इशारा
अमेरिका आणि यूरोपियन देशांनी रशियानं यूक्रेनवर आक्रमण केल्यानं अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची संपत्ती जप्त करण्याचा इशारा दिला होता. संपत्ती जप्त करण्याबाबत पाऊल उचलणाऱ्या अमेरिका आणि यूरोपियन देशांना रशियानं प्रत्युत्तर दिलं आहे. पुतिन यांची संपत्ती जप्त केल्यास रशियात असणारी अमेरिका आणि यूरोपियन देशांची संपत्ती जप्त करु, असा इशारा रशियानं दिला आहे.
Russia says relations with the West and America have come close “to a point of no return”.
This, as “Yars” thermonuclear-armed mobile ICBM launchers are filmed driving along the ring-road outside Moscow pic.twitter.com/oWLB0cekn6
— Murad Gazdiev (@MuradGazdiev) February 25, 2022
जो बायडन यांचा तिसऱ्या महायुद्धाचा इशारा
रशियानं सध्या दोनचं पर्याय जगासमोर सोडले आहेत. एकतर रशियासोबत युद्ध पुकारुन तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात करावी लागेल. किंवा आंतरराष्ट्रीय कायदे मोडणाऱ्यांवर कठोर निर्बंध लावून कायमस्वरुपी धडा शिकवावा लागेल. तिसरं महायुद्ध टाळायचं असेल तर रशियावर कठोर निर्बंध लावून धडा शिकवावा लागेल, असं जो बायडन म्हणाले.
टीव्ही 9 मराठीच्या दर्शकांना काय वाटतं?
अफगाणिस्तानमधून हळू हळू अमेरिकेनं त्यांचं सैन्य कमी केलं. ज्या तालिबानला घालवून अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये लोकशाही सरकार आणलं त्याच तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला. ही घटना ताजी आहे. त्यानंतर रशियाला यूक्रेनवर हल्ला करण्यापासून अमेरिका रोखू शकला नाही. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीनं दर्शकांना यूक्रेनच्या युद्धानं अमेरिकेंचं महासत्तापद संपवलं, आता रशिया हाच जगाचा दादा? हा प्रश्न विचारला असता. 1 लाख 1 हजार 384 दर्शकांनी त्यांचं मत नोंदवलं. त्यापैकी 57 टक्के दर्शकांनी रशिया हाच जगाचा दादा असल्याच्या पर्यायाच्या बाजूनं कौल दिला आहे. तर, 26 टक्के दर्शकांना अमेरिका हा जगाचा दादा असल्याचं वाटतं. तर, 17 टक्के दर्शकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.
इतर बातम्या:
VIDEO : खारकीवच्या रस्त्यांवर आर-पारची लढाई; रशियन युक्रेनी सेना आमने-सामने-Russia Ukraine War