Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर टाकला 500 किलोचा बॉम्ब, युक्रेनच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
500 kg Russian Bomb in Ukraine: रशियाने युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर बॉम्ब टाकला आहे, हा बॉम्ब तब्बल 500 किलोचा आहे. त्याचा फोटो देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आज 13 व्या दिवशीही सुरू आहे (Russia Ukraine War). यात युक्रेनची सुंदर शहरे उध्वस्त झाली आहेत आणि हजारो लोक मरण पावले आहेत. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनवर 500 किलोचा बॉम्ब टाकला आहे (Russian Bomb Fell on Ukraine). पूर्व युक्रेनमधील चेर्निहाइव्ह शहरातील एका इमारतीवर हा बॉम्ब टाकण्यात आला. मात्र सुदैवाने बॉम्बचा स्फोट झाला नाही. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा (Dimitri Kuleba) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हा भीषण 500 किलो वजनाचा रशियन बॉम्ब चेर्निहाइव्हमधील एका इमारतीवर टाकण्यात आला मात्र त्याचा स्फोट झाला नाही. आणखी बरेच बॉम्ब पडले आहेत ज्यात कित्येकजण मरण पावले आहेत. आमच्या लोकांना रशियाच्या अमानुष लोकांपासून वाचवण्यास मदत करा! आम्हाला एअर स्पेस बंद करण्यास मदत करा. आम्हाला लढाऊ विमाने द्या. काहीतरी करा!”असे आवाहनही त्यांनी केले आहे.
युक्रेनच्या मंत्र्यांचे ट्विट काय?
This horrific 500-kg Russian bomb fell on a residential building in Chernihiv and didn’t explode. Many other did, killing innocent men, women and children. Help us protect our people from Russian barbarians! Help us close the sky. Provide us with combat aircraft. Do something! pic.twitter.com/3Re0jlaKEL
— Dmytro Kuleba (@DmytroKuleba) March 6, 2022
रशियाचे टार्गेट काय?
रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. राजधानी कीव ताब्यात घेण्याचा त्यांचा मानस आहे. युक्रेनच्या सैन्याने एएफपीला सांगितले की “शत्रू युक्रेनवर आक्रमण सुरू ठेवत आहे.” त्यांचे टार्गेट कीव, खार्किव, चेर्निहाइव्ह, सुमी आणि मायकोलायव्हला ताब्यात घेणे हे आहे.’ रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून 15 लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे. युक्रेन वारंवार पाश्चात्य देशांना नो-फ्लाय झोन लागू करण्याचे आवाहन करत आहे. मात्र ते ही मागणी मान्य करत नाहीत.
युद्धात रशियाचे किती नुकसान?
युक्रेनकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 8 मार्चपर्यंत रशियाचे युद्धात काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. या आकडेवारीनुसार, आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मरण पावले आहेत. यात 303 टँक, 1036 लढाऊ वाहने, 120 तोफा, 26 मल्टी-लाँच रॉकेट सिस्टीम, 27 हवाई संरक्षण स्थळं, 48 विमाने, 80 हेलिकॉप्टर, 474 ऑटोमोटिव्ह शस्त्रे, 3 जहाजे, 60 इतर यूएव्ही टॅंक आणि 7 यूएव्ही वाहने नष्ट करण्यात आली, अशी माहिती युक्रेनकडून देण्यात येत आहे.
Russia Ukraine War : मोदी आणि पुतीन यांच्यात तासभर चर्चा, रशियाचा युक्रेनबाबत पवित्रा काय?