Russia Ukraine War : मोदी आणि पुतीन यांच्यात तासभर चर्चा, रशियाचा युक्रेनबाबत पवित्रा काय?
र रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) आणि पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मोदींनी सध्याच्या परिस्थिबाबत पुतीन यांच्याकडून आढावा घेतला आहे.
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्दावर (Russia Ukraine War) अजूनही तोडगा निघाला नाही. रशियाने अजूनही युक्रेनला गंभीर इशारा दिला आहे. तर दुसरीकडे रशियाचे युद्धात मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याच परिस्थिवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) आणि पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मोदींनी सध्याच्या परिस्थिबाबत पुतीन यांच्याकडून आढावा घेतला आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची तिसरी फेरी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रिशियाची टीम बेलारुसमध्ये पोहोचली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन आणि रशियाच्या चर्चेच्या स्थितीची माहिती दिली. पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना त्यांच्या संघांमध्ये सुरू असलेल्या चर्चेव्यतिरिक्त युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. सुमीसह युक्रेनच्या काही भागांमध्ये युद्धविराम आणि कॉरिडॉरच्या घोषणेची त्यांनी प्रशंसा केली.
अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यावर भर
पंतप्रधान मोदींनी सुमीमधून भारतीय नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यावर भर दिला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पीएम मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी देखील बोलले आणि त्यांना युद्धग्रस्त शान्य शहर सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मदत करण्याची विनंती केली. सुमारे 35 मिनिटे चाललेल्या या संभाषणात दोन्ही नेत्यांनी पूर्व युरोपीय देश युक्रेनमधील उद्भवणाऱ्या परिस्थितीवरही चर्चा केली. अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सुमारे 700 भारतीय विद्यार्थी अजूनही सुमीमध्ये अडकले आहेत.
चर्चेतून मार्ग निघणार?
सुमीमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मदत करत राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी युक्रेन सरकारला केले. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या थेट चर्चेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. त्याचबरोबर युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने दिलेल्या मदतीबद्दल त्यांनी झेलेन्स्की यांचे आभार मानले. युक्रेनियन नागरिकांच्या स्थलांतरासाठी रशियाने सोमवारी सकाळपासून युद्धविरामासह अनेक भागात कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली आहे. उत्तर, दक्षिण आणि मध्य युक्रेनमधील शहरांमध्ये रशियाने गोळीबार सुरू ठेवल्याने हजारो युक्रेनियन सुरक्षितपणे पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी कीवच्या उपनगरातील नागरिकांना बाहेर काढण्यात अयशस्वी झाल्याची माहिती दिली.