तब्बल 18 दिवसांनी त्याचं पार्थिव भारतात येणार, युक्रेन युद्धात भारतीयांच्या जखमा भेगाळल्या
कर्नाटकातील ज्या विद्यार्थ्याचा युक्रेनमधील गोळीबारात मृत्यू झाला होता, त्याचा मृतदेह रविवारी भारतात पोहोचणार असल्याचे प्रशानाकडून सांगण्यात आलंय. त्या आठवणीत भारतीयांचे डोळे पुन्हा पाणावले आहेत.
नवी दिल्ली : गेल्या तीन आठवड्यापासून संपूर्ण जग युक्रेनमधील (Russia Ukraine War) विध्वंस पाहत आहे. त्यात अनेक देशातील लोक अडकले होते. मोठ्या संख्येने भारतीयही युक्रेनमध्ये अडकले होते. भारतीयांना सोडवण्यासाठी प्रशासनाने दिवसरात्र एक केला. मात्र तरीही दोन भारतीयांचा युद्धावेळी मृत्यू (Indian Student Death) झाला. एका मृत्यू रशियाने केलेल्या गोळीबारात झाल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्याचा आजारपणात मृत्यू झाल्याचे सांगितले. यात अनेक भारतीय जखमीही झाले. अनेकांनी भयंकर हाल सोसले. जीव वाचवण्यासाठी मोठी वाणवण केली. मोठ्या संख्येने युक्रेनमधील भारतीयांना बाहेर काढण्यात आले. मात्र मृत्यू झालेल्यांचे मृतदेह (Indian Student Death body) अद्यापही भारतात आलेले नाहीत. कर्नाटकातील ज्या विद्यार्थ्याचा युक्रेनमधील गोळीबारात मृत्यू झाला होता, त्याचा मृतदेह रविवारी भारतात पोहोचणार असल्याचे प्रशानाकडून सांगण्यात आलंय.
कुटुंबियांचे डोळे पुन्हा पाणावले
कर्नाटकातील मेडिकलला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची प्रतिक्षा त्याच्या कुटुंबियांना अजूनही लागली आहे. नवीन शेखरअप्पा यांच्या कुटुंबियांच्या जखमा कधीही भरून न निघणाऱ्या आहेत. मात्र मृतदेह आता लवकरच भारतात येत असल्याने किमान त्यांचे अंतिम दर्शन तरी त्याच्या कुटुंबियांना घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांचे पार्थिव आणण्याच्या सूचना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या. तब्बल 18 दिवसांनंतर नवीनचे पार्थिव भारतात आणले जाणार असल्याने भारतीयांच्या डोळ्यात पुन्हा त्या गोळीबाराच्या आठवणीने पाणी उभा राहिले आहे.
तीन आठवड्यानंतर पार्थिव येणार
रशियाकडून झालेल्या गोळीबारात मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असून त्याचे जन्मस्थान कर्नाटकातील चलागेरी असून तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. युक्रेनमधील खारकीव्ह शहरात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना जेव्हा परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला त्यावेळी नातेवाईकांना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली. त्याचा मृत्यू या हल्ल्यात कसा झाला आणि त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह भारतातील नातेवाईकांकडे देण्यात येईल का याबाबतही चौकशी केल्यानंतर त्याचा मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेला तब्बल 18 दिवस लागले आहे.
Video : BJP नेत्यांचे बिंग फोडणारी CD मलिकांकडे म्हणून अटक, ज्युन्या भाषणाच्या Videoने खळबळ
संजय राऊतांसह 6 खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार, यादीत राज्यातल्या बड्या नेत्यांची नावं