Video | Russia Ukraine War : क्रिमियाला पाणीपुरवठा करणारे धरण उडवले
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे अनेक भीतीदायक आणि मन हेलावून सोडणारे व्हिडीओ समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. क्रिमियाला पाणीपुरवठा करणारे तसेच अतिरिक्त पाण्यापासून संरक्षण करणारे धरणच बॉम्बने उडून देण्यात आले आहे. हा बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की, क्षणात धरण उद्धवस्थ झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या अनेक दिवसांपासून संर्घष सुरू होता. या संर्घषाचे रुपांतर अखेर युद्धात झाले आहे. गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आणि त्यानंर घमासान युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील गेल्या चार दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्य स्थळे उद्धवस्त केली आहेत. याचदरम्यान एक व्हिडीओ (Video) समोर आला आहे. ज्या व्हिडीओमध्ये क्रिमियाला पाणीपुरवठा करणारे तसेच अतिरिक्त पाण्यापासून संरक्षण करणारे धरणच बॉम्बने उडून देण्यात आले आहे. हा बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की, क्षणात धरण उद्धवस्थ झाले. बॉम्बस्फोट होतात पाण्याची एक उंच लाट उसळली. युद्धादरम्यान सर्वच बाजुने युक्रेनची नाकेबंदी करण्याचा रशियाचा प्लॅन आहे. याच पार्श्वभूमीवर धरणात बॉम्बस्फोट घडवण्यात आला असावा असा अंदाज आहे.
रशियाची आक्रमक भूमिका
दरम्यान रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून रशिया सातत्याने युक्रेनची राजधानी कीवर हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेलाय. जगभरातून रशियाचा निषेध करण्यात येत आहे. मात्र रशिया अधिक आक्रमक झाला असून, आता रशियाकडून अणूबॉम्ब प्लांट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. बेलारुसने रशियाला आपल्या हद्दीत अण्ववस्त्रासाठी जाग दिल्याचे बोलले जात आहे. या सर्वच पार्श्वभीवर जगभरात चिंतेचे वातावरण आहे.
अमेरिकेचा इशारा
दरम्यान दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी देखील रशियाला गंभीर इशारा दिला आहे. रशियाने आमच्या पुढे दोनच पर्याय ठेवल्याचे त्यांनी म्हले आहे. एक म्हणजे तिसरे महायुद्ध किंवा कडक आर्थिक निर्बंध असे बायडन यांनी म्हटले आहे. युरोपीयन संघाकडून रशियावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील रशिया या देशांना दाद देत नसल्याचे चित्र आहे.
Dam blocking water supply to Crimea blown up pic.twitter.com/0CyeEZ3eL8
— RT (@RT_com) February 27, 2022
संबंधित बातम्या
आता दोनच पर्याय; एक तिसरे महायुद्ध किंवा आर्थिक निर्बंध, बायडन रशियावर संतापले
वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!