Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : यूक्रेनच्या पाटलाची तऱ्हा न्यारी, मायदेशी जाईन तर बिबट्या आणि पँथरसह!, भारत सरकारसमोर पेच

जग्वार कुमार या नावानं प्रसिद्ध असलेले भारतीय डॉक्टर गिरीकुमार पाटील यांनी एक बिबट्या आणि एक ब्लॅक पँथर पाळलेला आहे. या प्राण्यांसह त्यांना भारतात यायचं आहे. मात्र, भारतीय दूतावासाकडून आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय. बिबट्या आणि ब्लॅक पँथरशिवाय मी यूक्रेन सोडणार नाही, असं पाटील यांनी म्हटलंय.

Russia Ukraine War : यूक्रेनच्या पाटलाची तऱ्हा न्यारी, मायदेशी जाईन तर बिबट्या आणि पँथरसह!, भारत सरकारसमोर पेच
यूक्रेनमधील गिरीकुमार पाटील यांचा आपला बिबट्या आणि ब्लॅक पँथरशिवाय भारतात परतण्यास नकारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 6:07 PM

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाचा (Russia Ukraine War) आज 12 वा दिवस आहे. रशिया-यूक्रेनमधील संघर्षाचा भारतावर थेट परिणाम पाहायला मिळतोय. हजारो भारतीय नागरिक आणि वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी (Indian Students) यूक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुखरुपपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) हाती घेतलं आहे. या अभियानात वायूदलाच्या विमानांद्वारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना परत आणलं जात आहे. मात्र, एका भारतीय डॉक्टरने भारतात परत येण्यास नकार दिलाय. त्यासाठी त्यांनी एक महत्वाचं कारणही दिलंय.

जग्वार कुमार या नावानं प्रसिद्ध असलेले भारतीय डॉक्टर गिरीकुमार पाटील यांनी एक बिबट्या आणि एक ब्लॅक पँथर पाळलेला आहे. या प्राण्यांसह त्यांना भारतात यायचं आहे. मात्र, भारतीय दूतावासाकडून आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय. बिबट्या आणि ब्लॅक पँथरशिवाय मी यूक्रेन सोडणार नाही, असं पाटील यांनी म्हटलंय. ‘मी अनेकदा भारतीय दूतावासाला संपर्क साधला. पण त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. मी असलेल्या संपूर्ण परिसरात रशियन सैन्याचा वावर आहे. मात्र, मी मला शक्य ते सर्व प्रयत्न करतोय. मी त्यांना माझ्या मुलांप्रमाणे सांभाळलं आहे, असं गिरीकुमार पाटील यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना सल्ला

रशिया यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदिमीर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा केली. मोदींनी झेलेन्स्की यांच्यासोबत जवळपास 35 मिनिटे फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर मोदी आणि पुतिन यांच्यातही जवळपास 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती एएनआयने दिलीय.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना थेट यूक्रेनसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला. मोदींनी पुतिन यांना त्यांच्या टीमच्या माध्यमातून सुरु असलेल्या वाटाघाटीसोबतच थेट झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

इतर बातम्या : 

आधी झेलेन्स्कींशी बोलले नंतर पुतिनशी, मोदींनी रशिया-युक्रेन युद्धात नेमका काय तोडगा सांगितला?

Ukraine Russia War | तू भावाला कुठे विसरली?, तू त्याला कुठे सोडून आली?, युक्रेनमधून परतलेल्या मुलीला आईचे ह्रदयद्रावक सवाल

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.