Russia Ukraine War : यूक्रेन यूरोपीय यूनियनमध्ये सहभागी होणार! राष्ट्रपती जेलेन्स्की यांची अर्जावर स्वाक्षरी
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी यूक्रेनला यूरोपीय यूनियनमध्ये (European Union) सहभागी करण्याच्या अर्जावर स्वाक्षरी केलीय. इतकंच नाही तर यूक्रेनने हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलंय.
नवी दिल्ली : रशिया यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर अजून एक महत्वाची बातमी समोर आलीय. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी यूक्रेनला यूरोपीय यूनियनमध्ये (European Union) सहभागी करण्याच्या अर्जावर स्वाक्षरी केलीय. इतकंच नाही तर यूक्रेनने हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे यूक्रेनचे पंतप्रधान डेनिस शिमगल यांनी हे पाऊल यूक्रेन आणि इथल्या नागरिकांची पसंती आहे, आम्ही यापेक्षा अधिक लायक आहोत, असं म्हटलंय. रशियाने यूक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर यूरोपीय संघाने नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर त्यांनी रशियावर मोठे प्रतिबंधही लादले आहेत. रशियाच्या बँकिंग यंत्रणेला SWIFT बाहेर करण्याची घोषणाही त्यांनी केलीय. तसंच रशियाच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीत प्रवेशबंदी केली आहे.
यूक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा करणार
रशियाने यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर यूरोपीय संघाने यूक्रेनला सहकार्याची घोषणा केलीय. यूरोपीय संघाने सांगितलं की ते यूक्रेनला लवकरच शस्त्रास्त्र पुरवठा करतील. ही इतिहास बदलवणारी वेळ असल्याचं यूरोपीय संघाचे अध्यक्ष उर्सुला वोन देर लेयेन यांनी म्हटलंय.
Ukraine President Volodymyr Zelenskyy has signed an application for the membership of Ukraine in the European Union, announces Parliament of Ukraine pic.twitter.com/n6JDfh1G6k
— ANI (@ANI) February 28, 2022
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत चर्चा
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आज यूक्रेनवरील सत्र 1 मिनिटाचं मौन बाळगून सुरु झालं. रशिया-यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या यूएनजीएने आपल्या 11 व्या आपातकालीन विशेष सत्रात म्हटलं की, आम्ही सर्व पक्षांकडून तात्काळ युद्धविरामाचं आवाहन करतो. तसंच संयम पाळा आणि चर्चेला सुरुवात करा. कूटनिती आणि संवाद कायम ठेवला पाहिजे. संयुक्त राष्ट्र महासचिव एन्टोनियो गुटेरेस म्हणाले की, मानवता सहकार्य महत्वपूर्ण आहे, युद्धे हे समाधान नाही. शांतीच्या मार्गानेच समाधान होऊ शकतं. मी यूक्रेनच्या राष्ट्रपतींना संयुक्त राष्ट्र सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. यूक्रेनमधील युद्ध कुठल्याही स्थितीत बंद व्हावं.
रशियाचे हल्ले रोखा- यूक्रेन
यूएनजीएच्या आपातकालीन बैठकीत बोलताना यूक्रेनच्या प्रतिनिधीने रशियाचे हल्ले रोखण्याचं आवाहन केलं आहे. यूक्रेनमध्ये 16 लहान मुलांसह 352 लोकांचा मृत्यू झालाय. ही संख्या सातत्याने वाढतेय, गोळीबार, मिसाईल हल्ले सुरु आहेत. हे हल्ले रोखले जावेत. आम्ही रशियाने विनाअट आपले सैन्य परत घेणे आणि आंतरराष्ट्रीय मानवी कायद्याचं पालन करण्याची मागणी करतो.
As of today, 352 people including 16 children killed on the Ukraine side. These numbers growing nonstop, shelling continues: Ukraine Representative at UNGA emergency meeting on #UkraineRussiaConflict pic.twitter.com/JkQwPtP0FC
— ANI (@ANI) February 28, 2022
इतर बातम्या :