Russia Ukraine War : ‘रशिया-यूक्रेनमधील युद्ध कुठल्याही स्थितीत थांबणं गरजेचं’, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत चर्चा
संयुक्त राष्ट्र महासचिव एन्टोनियो गुटेरेस म्हणाले की, मानवता सहकार्य महत्वपूर्ण आहे, युद्धे हे समाधान नाही. शांतीच्या मार्गानेच समाधान होऊ शकतं. मी यूक्रेनच्या राष्ट्रपतींना संयुक्त राष्ट्र सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. यूक्रेनमधील युद्ध कुठल्याही स्थितीत बंद व्हावं.
नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेनमध्ये (Ukraine) सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसायला सुरुवात झालीय. अशावेळी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (United Nations General Assembly) आज यूक्रेनवरील सत्र 1 मिनिटाचं मौन बाळगून सुरु झालं. रशिया-यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या यूएनजीएने आपल्या 11 व्या आपातकालीन विशेष सत्रात म्हटलं की, आम्ही सर्व पक्षांकडून तात्काळ युद्धविरामाचं आवाहन करतो. तसंच संयम पाळा आणि चर्चेला सुरुवात करा. कूटनिती आणि संवाद कायम ठेवला पाहिजे. संयुक्त राष्ट्र महासचिव एन्टोनियो गुटेरेस (António Guterres) म्हणाले की, मानवता सहकार्य महत्वपूर्ण आहे, युद्धे हे समाधान नाही. शांतीच्या मार्गानेच समाधान होऊ शकतं. मी यूक्रेनच्या राष्ट्रपतींना संयुक्त राष्ट्र सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. यूक्रेनमधील युद्ध कुठल्याही स्थितीत बंद व्हावं.
वाढती हिंसेमुळं नागरिकांचा मृत्यू होतोय. आता खूप झालं. सैनिकांनी आपल्या सैन्य तळावर परत जाणं गरजेचं आहे. नागरिकांची सुरक्षा करायला हवी. रशियाने क्लिअर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्यास सांगणं चिंताजनक आहे. आण्विक हल्ल्याचा विचार अकल्पनीय आहे. आम्ही अशा 100 क्षेत्रीय संकटांचा सामना करत आहोत, ज्यामुळे आम्हा सर्वांवर विनाशकारी प्रभाव होईल, असंही गुटेरेस यावेळी म्हणाले.
We call on Russia to respect international law; call on all UN members not to recognize the two separatist self proclaimed entities (Donetsk and Luhansk)…: EU Representative at UNGA meeting on #UkraineInvasion pic.twitter.com/D02ztiPNpq
— ANI (@ANI) February 28, 2022
रशियाचे हल्ले रोखा- यूक्रेन
यूएनजीएच्या आपातकालीन बैठकीत बोलताना यूक्रेनच्या प्रतिनिधीने रशियाचे हल्ले रोखण्याचं आवाहन केलं आहे. यूक्रेनमध्ये 16 लहान मुलांसह 352 लोकांचा मृत्यू झालाय. ही संख्या सातत्याने वाढतेय, गोळीबार, मिसाईल हल्ले सुरु आहेत. हे हल्ले रोखले जावेत. आम्ही रशियाने विनाअट आपले सैन्य परत घेणे आणि आंतरराष्ट्रीय मानवी कायद्याचं पालन करण्याची मागणी करतो. तर रशियाच्या प्रतिनिधीने यूक्रेन आणि जॉर्जियाकडून नाटो (NATO) मध्ये सहभागी होण्याबाबत योजना आखली जात होती. रशियाला विरोध करणारा यूक्रेन तयार करणे आणि त्याला नाटोमध्ये सहभागी करणे हे त्यांचे (अमेरिका) धोरण होते. यूक्रेन नाटोमध्ये सहभागी होण ही लाल रेषा आहे, जी आम्हाला प्रतिरोधात्मक उपाय योजन्यासाठी भाग पाडते.
As of today, 352 people including 16 children killed on the Ukraine side. These numbers growing nonstop, shelling continues: Ukraine Representative at UNGA emergency meeting on #UkraineRussiaConflict pic.twitter.com/JkQwPtP0FC
— ANI (@ANI) February 28, 2022
Action plans were being made by #Ukraine & Georgia to join NATO. Their (US) policy was to create anti-Russia Ukraine & ensured that it joined NATO. Ukraine joining NATO is a red line, compels us to adopt measures in response; has placed us at the verge of this conflict:Russia Rep pic.twitter.com/N1kO04q2lg
— ANI (@ANI) February 28, 2022
रशियाकडून 35 देशांसाठी हवाई हद्द बंद
रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियाविरोधात प्रतिबंध लादायला सुरुवात केलीय. या प्रतिबंधांमुळे संतापलेल्या आणि चिंतित असलेल्या ब्लादिमीर पुतिन यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीय. पुतिन यांनी 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंद केलीय. मिळालेल्या माहितीनुसार रशियानं ब्रिटन आणि जर्मनीसह 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंदी केली आहे.
इतर बातम्या :