Russia Ukraine War : पुतीन यांची हत्या केली पाहिजे, अमेरिकन सिनेटरच्या वक्तव्याने खळबळ

अमेरिकेच्या सिनेटरने खळबळजनक विधान केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची कोणीतरी हत्या करावी, असे अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम (Lindsey Graham) यांनी म्हटले आहे.

Russia Ukraine War : पुतीन यांची हत्या केली पाहिजे, अमेरिकन सिनेटरच्या वक्तव्याने खळबळ
अमेरिकन सिनेटरचे खळबळजनक वक्तव्यImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 4:15 PM

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) दरम्यान अमेरिकेच्या सिनेटरने खळबळजनक विधान केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची कोणीतरी हत्या करावी, असे अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम (Lindsey Graham) यांनी म्हटले आहे. लिंडसे ग्रॅहम हे एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले की, पुतीनला मारण्यासाठी रशियात कोणीतरी पुढे यावे. तरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल. अमेरिकन सिनेटरच्या या वक्तव्यावर रशिया चांगलाच संतापला असून या प्रकरणावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लिंडसे ग्रॅहम यांनी पुतीनची हत्या करावी असे वक्तव्य करणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे रशियन दूतावासाने म्हटले आहे. अमेरिकेतील रशियाचे राजदूत अनातोली अँटोनोव्ह यांनी अमेरिकेने या विधानावर अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही केली आहे.

सिनेटरचे खळबळजनक वक्तव्य

सिनेटर नेमकं काय म्हणाले?

त्यांनी बोलताना ब्रुटस आणि कर्नल स्टॉफेनबर्ग यांचाही उल्लेख केला आहे. ज्युलियस सीझर हा रोमन सेनापती होता ज्याची ब्रुटसने हत्या केली होती. याशिवाय 20 जुलै 1944 रोजी जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या हत्येचा प्रयत्न कर्नल स्टॉफेनबर्ग या जर्मन लष्करी अधिकाऱ्याने केला होता. सिनेटरच्या या वक्तव्यानंतर यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. आधीच रशिया आणि अमेरिकेत या युद्धावरून टोकाचा संघर्ष सुरू आहे. रशियाला अनेकदा बायडेन यांनी इशाराही दिला आहे. मात्र अमेरिकेचा विरोध झुगारून रशियाने हे युद्ध सुरूच ठेवले आहे. आता या वक्तव्याने हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अमेरिकेची याबाबत अधिकृत भूमिका काय येते, हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

नवव्या दिवशीही हल्ले सुरूच

रशियन सैनिकांनी आज युक्रेनमध्ये असलेला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झियाच्या परिसरात तुफान गोळीबार केला होता. त्यानंतर आता रशियन सैनिकांनी झापोरिझ्झिया प्रकल्प ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. रशियन सैनिकांनी अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या नऊ दिवसांपासून हे घमासान युद्ध दोन्ही देशात सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही देशात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. मात्र यातून अद्याप तोडगा निघाला नाही. अनेक युक्रेनिय तसेच इतर देशातील लोकांचे युद्धामुळे स्थलांतर झाले. आहे. युक्रेनच्या आकाशात सततच्या हल्ल्याने धुराचे लोट दिसत आहे. त्यातच हे वक्तव्य युद्धाची तीव्रता आणखी वाढवणार का? असाही सवाल उपस्थित झाला आहे.

रक्तरंजीत युक्रेन, युद्धाच्या भयाण जखमा, हजारोंचं भरल्या उरानं स्थलांतर

VIDEO | इमारती उद्ध्वस्त, शहरं बेचिराख, तरीही युक्रेनवासियांचा संघर्ष कायम, पाहा जिंदादिली दाखवणारा व्हिडीओ

दिलासादायक बातमी ! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियाच्या 130 बस तयार, रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राची माहिती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.