रशिया आणि युक्रेनचे युद्ध (Russia Ukraine War) आता वाटाघाटीच्या मार्गावर आले आहे. दोन्ही देशात चर्चेने मार्ग काढण्यावर सहमती झाली आहे. मात्र दुसरीकडे युक्रेनने गाफील न राहता, दुसरा प्लॅनही तयार ठेवला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील बैठकीपूर्वी (Russia Ukraine Meeting) युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, बैठकीत युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला जाईल. रशियन लष्कराने युक्रेनमधून आपले सैनिक मागे घ्यावेत. परिस्थिती पाहता रशियाने तात्काळ युद्धविराम जाहीर करावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलीय. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आतापर्यंत दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. या युद्धामुळे मोठ्या संख्येने लोक देश सोडून गेले आहेत. त्याचवेळी रशियाने आता युक्रेनमधील अनेक छोटी शहरे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युक्रेन युद्धाचा अनुभव असणाऱ्या कैद्यांना (prisoners) युद्धभूमिवर रशियाविरोधात उतरवण्याच्या तयारीत आहे.
युक्रेन कैद्यांना युद्धात उतरवणार
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, आत्ताच्या परिस्थितीत आपल्यातील प्रत्येकजण योद्धा असल्याचे दाखवून दिले आहे. सर्व योद्धे त्यांच्या जागी आहेत आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण जिंकेल. शियाविरुद्धच्या लढाईत सामील व्हायचे असल्यास युक्रेन लष्करी अनुभव असलेल्या कैद्यांची सुटका करेल, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यात बेलारूसमध्ये चर्चा होत आहे. यासाठी युक्रेनचे शिष्टमंडळ बेलारूसला पोहोचले आहे. दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर आहेत. या संवादातून युद्धाच्या समाप्तीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज लावला आहे. युद्ध समाप्तीची घोषणा झाल्यास फक्त युक्रेनलाच नाही तर जगाला मोठा दिलासा मिळू शकतो.
आधी नकार, पुन्हा होकार
युक्रेनने यापूर्वी बेलारूसमध्ये चर्चा करण्यास नकार दिला होता. आधी चर्चेसाठी इतर ठिकाणांची नावं सुचविली. मात्र आता दोन्ही देश चर्चेसाठी तयार झाले आहेत. या संवादातून मार्ग निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे, दरम्यान यात बेलारूस मोठा निर्णय घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. बोलणे अयशस्वी झाल्यास बेलारूस आपले सैन्य युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठवू शकते, असे बोलले जात आहे. रशिया आणि बेलारूस यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे उघडपणे युक्रेनविरोधात बेलारूसही युद्धात उतरू शकते. या युद्धाची पुढची दिशा ही चर्चा संपल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या चर्चा सुरू असतानाही रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले चढवले आहेत. त्याचाही परिणाम चर्चेवर होऊ शकतो.
Baba Vanga Prediction : सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र…; बाबा वेंगांनी केली होती भविष्यवाणी
बेलारूसची रशियाला मदत; रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार? युक्रेनचे टेन्शन वाढले