नवी दिल्ली : रशिया-युक्रेन वाद (Russia-Ukraine crisis) दिवसागणिक चिघळत चालला आहे. आगामी काळात नव्या समस्यांना तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी उचललेल्या पावलांवर रशियानं अख्खा जगालाच गर्भित इशारा दिला आहे. रशियाच्या उर्जा पुरवठ्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास पश्चिमीय राष्ट्रांना 300 डॉलर प्रति बॅरेल (Crude oil price) भावाने कच्चे तेल खरेदी करावे लागेल असे इशारा रशियानं दिला आहे. रशिया-जर्मनी गॅस पाईपलाईन (RUSSIA-GERMANY PIPELINE) बंद करण्याचा देखील इशारा रशियाच्या उच्चपदस्थांनी दिला आहे. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकासहित युरोपीय राष्ट्रांनी धोरणात्मक पावलं उचलली आहेत. अमेरिका, युरोप आणि अन्य राष्ट्रे एकत्रित येऊन रशियाच्या उर्जा पुरवठ्याला ब्रेक लावण्याच्या तयारीत आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसादामुळे वर्ष 2008 नंतर कच्च्या तेलाचे भाव पहिल्यांदाच 130 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत.
रशियाचे उपप्रंतप्रधान नोवक यांचं विधान समोर आलं आहे. रशियन तेलाच्या खरेदीला ब्रेक लागल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीचा आगडोंब उसळेल असे नोवक यांनी म्हटलं आहे. रशियाने कच्च्या तेलाची कोठारं सवलतीच्या दरात खुली केली आहेत. मात्र, युरोपीय राष्ट्रांच्या दबावामुळं तेलाची खरेदी करण्यासाठी कोणतेही राष्ट्र पुढं धजावत नाही. रशियाची अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या निर्यातीला ब्रेक लागल्यास रशियाची अर्थव्यवस्था डळमळू शकते.
रशियामधून रशियासाठी कच्चा तेलाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. रशिया सर्वात मोठा तेल उत्पादक देश मानला जातो. रशियात दररोज 11 मिलियन बॅरेल तेलाचं उत्पादन घेतलं जातं. त्यापैकी अर्धा भाग निर्यात केला जातो. निर्यातीच सर्वाधिक प्रमाण युरोपीय राष्ट्रात आहे. रशियातून युरोपला दररोज नियमित स्वरुपात 2.5-3 बॅरेल तेल निर्यात केलं जातं. त्यामुळे रशियानं तेलाची निर्यात बंद केल्यास युरोपला मोठ्या संघर्षझळा सोसाव्या लागू शकतात असा इशारा नोवक यांनी दिला आहे.
उपपंतप्रधान नोवक यांनी केवळ तेलच नव्हे तर युरोपला रशियातून गॅस पुरवठा केला जातो. त्यामुळे रशियावर निर्बंध लादल्यास जगाला परिणामांना सामोरं जावं लागेल असे नोवक यांनी म्हटलं आहे. युक्रेन विवादामुळं जर्मनीनं गेल्या महिन्यात रशियाला नॉर्ड स्ट्रीम-2 गॅस पाईपलाईनला सर्टिफिकेशन देण्यास नकारघंटा दर्शविली होती.
रशियाने युक्रेनवर टाकला 500 किलोचा बॉम्ब, युक्रेनच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
यूक्रेनच्या पाटलाची तऱ्हा न्यारी, मायदेशी जाईन तर बिबट्या आणि पँथरसह!, भारत सरकारसमोर पेच