यूक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचं काऊटडाऊन सुरु, 2 लाख सौनिकांना राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशाची प्रतिक्षा, अमेरिकी सुरक्षा सूत्रांचा मोठा दावा
अमेरिकी सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया बुधवारी यूक्रेनवर हल्ला करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रशिया यूक्रेनवर सकाळी 5.30 वाजता हल्ला करणार आहे. पहाटे तीन वाजता ब्लादिमीर पुतिन हल्ल्याचा आदेश देतील.
नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेनमध्ये (Ukraine) मागील काही दिवसांपासून मोठा तणाव पाहायला मिळत आहे. अशावेळी अमेरिकी सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया बुधवारी यूक्रेनवर हल्ला करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रशिया यूक्रेनवर सकाळी 5.30 वाजता हल्ला करणार आहे. पहाटे तीन वाजता ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हल्ल्याचा आदेश देतील. रशियाच्या निशाण्यावर यूक्रेनमधील मरियापोल हे पहिलं शहर असेल. हे शहर रूसपासून केवळ 48 किलोमीटर दूर आहे. रशियाचे 2 लाख सैनिक यूक्रेनवर हल्ला करतील, असं बोललं जात आहे.
यापूर्वी रशियाचे सैनिक मागे हटल्याची माहिती नाटोने दिली होती. मात्र, या वृत्तावर बोलताना यूक्रेनचे विदेश मंत्री म्हणाले की आम्ही आधी पाहू आणि मगच विश्वास ठेवू. यूक्रेन आणि पश्चिमी प्रदेशांनी रशियाच्या हालचाली रोखण्याच्या दिशेनं काम सुरु केलं आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेंस्की यांनी फेसबुक पोस्टद्वारे दावा केला होता की बुधवारी रशियाकडून यूक्रेवर हल्ला केला जाऊ शकतो.
यूक्रेनवर रशियाच्या आक्रमणाची अध्याधिक शक्यता?
यापूर्वी मॉस्कोनेही सांगितलं होतं की यूक्रेनच्या सीमेजवळ तैनात रशियाचे सैनिक मागे हटत आहेत. हे सैनिक आपल्या तळावर परतत आहेत. दक्षिणी आणि पश्चिमी मिलिट्री डिस्ट्रिक्टचं यूनिट सैन्य तळावर परतत असल्याचं मास्कोनं सांगितलं होतं. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, युद्ध ट्रेनिंग अॅक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर रशियाचे सैन्य आपल्या तळावर परततील. काही सैनिकांनी आपला टास्क पूर्ण केला आहे आणि ते आता ट्रेन आणि कारद्वारे परतत आहेत. मात्र, ब्रिटनचे विदेश सचिव लिज ट्रस यांनी मंगळवारी सांगितलं की यूक्रेनवर रशियाच्या आक्रमणाची अध्याधिक शक्यता आहे. लवकरच हा हल्ला होऊ शकतो आणि हा हल्ला यूरोपच्या व्यापक स्थिरतेसाठी मोठा धोका असेल.
व्लादिमीर पुतिन यांच्या उद्देशाबाबत शंका
दुसरीकडे ‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार क्रेमलिन (रशियाचे राष्ट्रपती कार्यालय) ने सोमवारी संकेत दिले होते की ते सुरक्षा तक्रारींबाबत पश्चिमी देशांसोबत चर्चेसाठी तयार आहेत. त्यामुळे अशी आशा निर्माण झाली होती. की रशिया सध्यातरी यूक्रेनवर हल्ला करणार नाही. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या उद्देशाबाबत शंका कायम आहे. तसंच शीतयुद्धानंतरच्या सर्वात वाईट तणावादरम्यान देश त्यांच्या मुत्सद्दींना परत बोलावत आहेत आणि संभाव्य युद्धाबद्दल सतर्क आहेत.
इतर बातम्या :