AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया आणि उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हल्ला, भारतातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लक्ष्य

भारतासह जगातील 7 प्रमुख कोरोना लस निर्मिती कंपन्यांवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

रशिया आणि उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हल्ला, भारतातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लक्ष्य
| Updated on: Nov 14, 2020 | 4:31 PM
Share

वॉशिंग्टन : भारतासह जगातील 7 प्रमुख कोरोना लस निर्मिती कंपन्यांवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. या कंपन्यांमध्ये भारतासह कॅनडा, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या प्रमुख फार्मास्युटिकल कंपन्यांचा समावेश आहे. यात काही कोरोना लसीवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचाही समावेश आहे. हा सायबर हल्ला रशिया आणि उत्तर कोरियामधून करण्यात आला. असं असलं तरी मायक्रोसॉफ्टने हल्ला झालेल्या कोरोना लस निर्मिती कंपन्यांची नावं जाहीर केलेली नाही (Russian and North Korean hackers tried to attack covid 19 vaccine manufacturers in India).

भारतात कमीत कमी 7 भारतीय फार्मा कंपन्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लस विकसित करण्याचं काम करत आहे. या सर्व कंपन्यांचं नेतृत्व सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक करत आहेत. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांना हॅकर्सने लक्ष्य केलंय त्यातील बहुतांश कंपन्यांच्या कोरोना लसीची वैद्यकीय चाचणी सुरु आहे.

कस्टमर सिक्युरिटी अँड ट्रटचे कॉर्पोरेट व्हाईस प्रेसीडन्ट टॉम बर्ट म्हणाले, “सायबर हल्ला झालेल्या कंपन्यांमध्ये एक संस्था कोरोना लशीची वैद्यकीय चाचणी करत आहे आणि एका संस्थेने कोविड-19 लसीची चाचणी विकसित केली आहे. या सायबर हल्ल्यात सरकारसोबत करार करण्यात आलेल्या किंवा सरकारी संस्थांनी ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना लक्ष्य करण्यात आलंय.”

स्ट्रोंटियम, झिंक आणि सेरिअम अशी सायबर हल्ला करणाऱ्या हॅकर्सची नावं आहेत. हे असे हल्ले आहेत ज्यात हजारो किंवा लाखो प्रयत्न करुन नागरिकांच्या बँक खात्यांमधील पैसे चोरले जातात. हे हॅकर्स कंपन्यांची गुप्त माहिती चोरतात आणि स्वतःला अधिकृत कंपनीचे प्रतिनिधी सांगून जॉबसाठी मेसेज पाठवतात. या हॅकर्सकडून नागरिकांना जागतिक आरोग्य संघटनेचे कोरोना साथीरोगाशी संबंधित मेसेजही पाठवले जात आहेत.

बर्ट म्हणाले, “या हल्ल्यांमधील बहुतांश हल्ले आम्ही आमच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन रोखलं आहे. तसेच आम्ही संबंधित सर्व संस्थांनाही याची माहिती दिली आहे. ज्या कंपन्यांवर सायबर हल्ला करण्यात हॅकर्स यशस्वी झाले, त्या कंपन्यांना आम्ही मदतही देऊ केली आहे.” याआधीही आरोग्य क्षेत्राला हॅकर्सने लक्ष्य करत सायबर हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वीच संपूर्ण अमेरिकेतील अनेक रुग्णालयांवर सायबर हल्ले झाले होते. यानंतर हॅकर्सकडून खंडणीचीही मागणी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण, समाधानकारक निकाल

Corona Vaccine | सीरम इन्स्टिट्यूट आणि ICMR ची मोठी घोषणा, लवकरच कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी

Corona Vaccine | संपूर्ण जगासाठी मोठी बातमी, अमेरिकेच्या फायजर कंपनीची लस चाचणीत 90 टक्के यशस्वी

व्हिडीओ पाहा :

Russian and North Korean hackers tried to attack covid 19 vaccine manufacturers in India

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.