Russia-Ukraine Crisis : रशियाचा युक्रेनच्या बंदरांवर कब्जा करण्याचा प्रयत्न, शहरांमध्ये युक्रेनची कडवी झुंज
अनेक विमानतळांवर, इंधन आणि इतर ठिकाणी हल्ले केल्यानंतर, रशियन सैन्य दक्षिणेकडील भागात असलेल्या मोक्याच्या बंदरांवर (port) आहे.
रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) सध्या कब्जातंत्र अवलंबले आहे. यात अनेक विमानतळांवर, इंधन आणि इतर ठिकाणी हल्ले केल्यानंतर, रशियन सैन्य दक्षिणेकडील भागात असलेल्या मोक्याच्या बंदरांवर (port) आहे. रशियाच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या क्रेमलिननुसार रशियाने युक्रेनशी शांतता चर्चेसाठी बेलारूसला एक शिष्टमंडळ पाठवले आहे. मात्र, याला सुरूवातील नकार दिल्यानंतर आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. रशियन सैन्य आज खार्किवच्या हद्दीत पोहोचले आहे. खार्किव हे रशियन सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. आता चर्चेसाठी दोन्ही बाजुने सकारात्मका निर्माण झाल्याने किमान आता तरी युद्ध संपेल अशी अपेक्षा सर्वांकडून वक्त करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी ही चर्चा सकारात्मक होणे गरजेचे आहे.
युक्रेनेच्या खासदारही युद्धात उतरल्या
रशियन सैन्याला शहरांमध्ये युक्रेनियन सैन्याकडून जोरदार प्रतिकार करावा लागत आहे. क्वीव आणि इतर शहरांचे रक्षण करण्यासाठी युक्रेनच्या सामान्य लोकही रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या बंदुका घेतल्या आणि रशियन सैन्याशी लढण्यासाठी पुढाकार घेतला. युक्रेनचे अधिकारी आंद्रे सिन्युक यांनी रविवारी होरोमाडस्के टीव्ही चॅनेलला सांगितले की सरकार देशासाठी लढू इच्छिणाऱ्या लष्करी अनुभव असलेल्या कैद्यांना सोडत आहे. मात्र यात कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यातील कैद्यांना सोडणार हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नाही. युक्रेनच्या राष्ट्रपतींपासून ते युक्रेनच्या महिला खासदारांपर्यंत सर्वजण सध्या हातात बंदुका घेऊन रशियाशी झुंज देत आहेत.
स्वातंत्र्य टीकवण्यासाठी कडवी झुंज
क्वीवच्या महापौरांच्या सांगण्यानुसार, वासिलिकिवमधील विमानतळाजवळील तेल डेपोमध्ये स्फोट झाल्याचे आकाशात दिसून. या भागात युक्रेनच्या सैनिकांची रशियन सैन्याशी जोरदार लढाई झाली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने सांगितले की जुलियानी विमानतळावर आणखी एक स्फोट झाला. झेलेन्स्कीच्या कार्यालयाने असेही म्हटले आहे की रशियन सैन्याने खार्किवमध्ये गॅस पाइपलाइन उडवली, ज्यामुळे सरकारने लोकांना त्यांच्या निवासस्थानाच्या खिडक्या ओल्या कापडाने झाकून धुरापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला. झेलेन्स्की म्हणाले की आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत, आमचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लढत आहोत. मात्र कालची रात्र कठीण होती. जोरदार गोळीबार झाला, अनेक भागांवरही बॉम्बफेक करण्यात आली आणि पायाभूत सुविधांना टार्गेट करण्यात आले.
Russia Ukraine war : बेलारुसमध्ये चर्चेसाठी यूक्रेनची सहमती, रशियन माध्यमांचा दावा, विध्वंस थांबणार?
रशिया-युक्रेन वादाच्या भारताला संघर्षझळा, केंद्र सरकार उचलणार ‘हे’ महत्वाचं पाऊल