Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियन सैनिकांचा Flirt game, युक्रेनच्या महिलांना Tinderवर पाठवतायत Messages आणि Photos!

Russia Ukraine conflict : रशियाने युक्रेनवर युद्ध लादले आहे. पुतिन यांनी कीवविरुद्ध (Kyiv) युद्ध पुकारलेय. यादरम्यान, दशा सिनेलनिकोवा (Dasha Synelnikova) या महिलेने सांगितले, की अनेक रशियन सैनिक (Russian soldiers) तिला टिंडरवर (Tinder) मेसेज पाठवत आहेत.

रशियन सैनिकांचा Flirt game, युक्रेनच्या महिलांना Tinderवर पाठवतायत Messages आणि Photos!
रशियन सैनिक फ्लर्ट करत असल्याचा दावा करणारी युक्रेनियन महिला Dasha Synelnikova (सौ. टिंडर)
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:02 PM

Russia Ukraine conflict : रशियाने युक्रेनवर युद्ध लादले आहे. पुतिन यांनी कीवविरुद्ध (Kyiv) युद्धाची घोषणा केली आहे. मॉस्कोनेही नाटो देशांना इशारा दिला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव आणि खार्किवसह अनेक शहरांमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. यादरम्यान, एका युक्रेनियन महिलेने दावा केला, की रशियन सैनिक तिला टिंडर सोशल मीडिया साइटवर फ्लर्टी संदेश पाठवत आहेत. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दशा सिनेलनिकोवा (Dasha Synelnikova) नावाच्या महिलेने सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक (Russian soldiers) तिला टिंडरवर (Tinder) मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत. दशाचा दावा आहे, की अनेक रशियन सैनिक तिला सोशल मीडियावर फ्लर्ट करण्यासाठी कॉल करत आहेत. काही सैनिकांनी त्यांची छायाचित्रे पाठवून त्यांच्या पदाची आणि स्थितीची माहिती दिली आहे.

युक्रेनच्या महिला त्रस्त

युक्रेनमधील अनेक महिलांच्या खात्यावर अशा संदेशांचा पूर येत असल्याचेही दशा म्हणते. असाच दावा करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे, की युक्रेनियन महिलांना आकर्षित करण्यासाठी रशियन सैनिकांनी डेटिंग अॅप्सवर त्यांची प्रोफाइल तयार केली आहे. 33 वर्षीय दशाच्या म्हणण्यानुसार, तिला एकट्याने टिंडरवर खाती तयार केलेल्या आंद्रेई, अलेक्झांडर, ग्रेगरी आणि मायकेल यांच्यासह डझनहून अधिक रशियन सैनिकांकडून मेसेज मिळाले आहेत.

‘सेटिंग बदलूनही उपयोग नाही’

दशा सिनेलनिकोवा कीव (Kyiv) युक्रेन येथे राहते. ती म्हणते, की तिच्या मित्राने तिला टिंडरवर अनेक रशियन सैनिक आल्याची माहिती दिली, म्हणून सुरुवातीला तिने लक्ष दिले नाही. तिलाही असेच मेसेज येऊ लागले, तेव्हा या प्रकरणाची खोली लक्षात आली. आक्षेपार्ह मेसेजेसना कंटाळून दशाने तिची लोकेशन सेटिंग बदलून खार्कीव केली, त्यानंतर तर परिस्थिती आणखीनच बिघडत गेली.

‘कल्पनाही करू शकत नाही’

दशाच्या म्हणण्यानुसार, ‘एका फोटोमध्ये एक रशियन सैनिक घट्ट स्ट्रीप सँडोमध्ये होता. तर कुणीतरी पिस्तुल घेऊन बेडवर पोज देत होते. दशाने या मानसिकतेची खिल्ली उडवली आणि सांगितले, की मला त्यापैकी एकही आकर्षक वाटला नाही. वैऱ्यांसोबत बोलण्याचाही विचार मी करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया तिनं दिली.

आणखी वाचा :

Russia Ukraine Crisis: ‘आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्धही जिंकू’, युक्रेनची गर्जना

रशिया-युक्रेन संघर्षातून तिसऱ्या महायुद्धाचे ढग! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारणही जाणून घ्या

Russia Ukraine Crisis: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, तिसऱ्या महायुद्धाची भीती आणखी वाढली!

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.