तुर्कीमध्ये शेजारी-शेजारी लावले रशिया-युक्रेनचे झेंडे, जाणून घ्या काय आहे कारण?
रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्रध्वजांचे शेजारी शेजारी असलेले हे चित्र तुर्कस्तानच्या रिसॉर्ट शहर अंतल्या येथील हॉटेलचे आहे. खरं तर, गुरुवारी तुर्कीमधील अंतल्या येथे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्ज व्हिक्टोरोविच लावरोव आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांच्यात त्रिपक्षीय चर्चा सुरू आहे.
रशियाने (russia) युक्रेनवरती (ukraine) हल्ला केल्यापासून अनेक देशांनी रशियाला विरोध दर्शविला होता. त्यामध्ये अमेरिका (america) जपान, दक्षिण कोरियासह ब्रिटेन इत्यादी देशांनी जाहीरपणे रशियाला विरोध दर्शविला होता.त्यामुळे रशिया देशाचे अनेक देशांशी असलेले संबंध खराब झाले आहेत. तुर्की देशाने सुध्दा रशियाला जाहीर विरोध दर्शविला होता. पण तुर्कीच्या एका हॉटेलमध्ये मालकाने रशिया आणि युक्रेनच्या देशाचे झेंडे आजूबाजूला लावल्याने त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. कारण युद्ध सुरू झाल्यापासून अनेक देशांनी रशिया जाहीरपणे विरोध दर्शविलेला आहे. त्याचबरोबर तुर्की देशाने सुध्दा रशियाचा निषेध केला होता. पण हॉटेल मालकाने केलेल्या कृतीचं सगळीकडे कौतुक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तुर्कीच्या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले असून अधिक लोकांना ते फोटो देखील आवडले आहेत. झेंडे पाहायला हॉटेलमध्ये गर्दी होत असून अनेकजण त्या झेंड्यांचे फोटो देखील काढत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्रध्वजांचे शेजारी शेजारी असलेले हे चित्र तुर्कस्तानच्या रिसॉर्ट शहर अंतल्या येथील हॉटेलचे आहे. खरं तर, गुरुवारी तुर्कीमधील अंतल्या येथे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्ज व्हिक्टोरोविच लावरोव आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांच्यात त्रिपक्षीय चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये शांतता करार करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कमला हॅरिस पोलंड दौ-यावर
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना युक्रेन शेजारी असलेल्या पोलंडमध्ये कमला हॅरिस दाखल झाल्या आहेत. कमला हॅरिस या पोलंड आणि रोमानिया देशातील प्रमुख नेत्यांशी चर्चा देखील करणार आहे. रशियाने केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे युक्रेनमधील कीव आणि खारकीव मधील अनेक नागरिकांनी पोलंड आणि रोमानिया या शहरात आपलं स्थलांतर केलं आहे. नागरिकांना तिथं मदत केल्याने कमला हॅरिस यांनी तिथल्या सरकारचे आभार देखील मानले आहेत. अमेरिका आणि पोलंड यांच्यात युक्रेनला लढाऊ विमाने पाठवण्याचा करार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या दौ-याला विशेष महत्त्व प्रात्प झाले आहे.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी युक्रेनमधून पाय काढला
युक्रेनवरती रशियाने जोरदार आक्रमण केल्यानंतर तिथल्या प्रमुख शहरातली अवस्था अत्यंत वाईट आहे. इमारती जमीनदोस्त केल्या आहेत, दळवळणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, रस्ते उद्वस्त केले आहेत. त्यामुळे तिथं काम करण्यास अनेक कंपन्यांना अडचण निर्माण होत आहे. तिथं असलेल्या जपानच्या कॉस्मेटिक कंपनीने कंपनी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच कंपनीने हे जाहीर केले आहे की आता आम्ही आमचे प्रोडक्ट रशियाला पाठवणार नाही.जर्मनीची मोठी कंपनी हुगोबॉस ही सुध्दा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानची कंपनी टोयोटाने सुध्दा दोन्ही देशात तुंबळ युध्द सुरु असल्याने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला.