सौदी अरेबियाचा पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय, भारताची नाराजी, ‘हा’ परिणाम होणार
सौदी अरेबियाने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे याचा भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम होणार आहे.
रियाध : कोरोनानंतर आता कुठे भारताची अर्थव्यवस्था काहीशी सुधारण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे बाजारातील पेट्रोल डिझेलच्या विक्रीतही वाढ होताना दिसतेय. मात्र, त्यातच सौदी अरेबियाने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील खनिज तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने (OPEC) कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे याचा भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केलीय (Saudi Arabia and OPEC countries take big decision on crude oil Petrol Diesel India affect badly).
भारताची कच्च्या तेलाची गरज मोठी आहे. अमेरिका आणि चीननंतर कच्चा तेलाचा ग्राहक देश म्हणून भारताचा तिसरा क्रमांक लागतो. त्यातच भारताला आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी एकूण 80 टक्के गरज आयातीतून भागवावी लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतींचा भारतावर थेट परिणाम होतो. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका भारताला बसेल.
Stressed on the need for reasonable pricing, which is both in the interests of producers and consumers. Production cuts may not be the most optimal way to encourage global economic recovery. #ACEnergyForum pic.twitter.com/LHOgwjsOMU
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) January 19, 2021
या आठवड्यात सौदी अरेबियाने कच्चा तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन 10 लाख बॅरलची कपात केलीय. दुसरीकडे ओपेक संघटनेच्या सदस्य देशांनी 97 लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे. भारताचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “मी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या योग्य किमती निश्चित करण्यावर भर दिलाय. असं करणं उत्पादक आणि ग्राहक दोघांच्या हिताचं आहे. कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय जागतिक आर्थिक सुधारणांसाठी चांगला निर्णय नाही.”
भारतात आधीच भारतात पेट्रोलच्या दराची नव्वदी पार
“भारताला कच्चा तेलाच्या किमतीत घट होण्याची आणि उत्पादनात वाढ होण्याची आशा होती. मात्र, या निर्णयाने निराशा झालीय. त्यामुळे भारताला आपल्या कच्चा तेलाच्या गरजेसाठी काही पर्यायी उर्जास्त्रोतांवर काम करावं लागेल,” असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. भारतात पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केलीय. जयपूरमध्ये बुधवारी (20 जानेवारी) पेट्रोलचे दर 92.69 रुपयांवर पोहचले आहेत. देशातील सर्वात कमी पेट्रोल दर चंदिगढमध्ये असून 82.04 रुपये प्रति लिटर इतके आहेत.
तज्ज्ञांच्या मते आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीत आणखी वाढ होईल. याची थेट झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीच्या तुलनेत भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती खूप अधिक असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. याचं कारण भारतात पेट्रोल डिझेलवर लादण्यात येणाऱ्या करांचं प्रमाण खूप अधिक आहे. सध्या भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीत 21 रुपयांच्या कराचा भार आहे.
हेही वाचा :
Petrol-Diesel Price Today | ग्राहकांना दिलासा, सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावलेले
करामुळे ‘कार’वाले धास्तावले, पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स अव्वाच्या सव्वा
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
व्हिडीओ पाहा :
Saudi Arabia and OPEC countries take big decision on crude oil Petrol Diesel India affect badly