पाकिस्तानला मंत्र्याचं वक्तव्य भोवलं, सौदी अरबच्या निर्णयाने पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

सौदी अरबच्या मदतीवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानवर सध्या वाईट दिवस आले आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आता सर्वात मोठा झटका बसलाय (Saudi Arabia stop financial help to Pakistan ).

पाकिस्तानला मंत्र्याचं वक्तव्य भोवलं, सौदी अरबच्या निर्णयाने पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 8:42 PM

रियाध : सौदी अरबच्या मदतीवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानवर सध्या वाईट दिवस आले आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आता सर्वात मोठा झटका बसलाय (Saudi Arabia stop financial help to Pakistan ). सौदी अरबचे प्रिंस मोहम्मद बिन सलमाननं पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या पाकिस्तानची स्थिती अधिक बिघडणार आहे.

विशेष म्हणजे सौदी अरबने केवळ आर्थिक मदतच बंद केलेली नाही, तर नवं कर्ज देणं थांबवत आधी घेतलेलं कर्जही तात्काळ फेडण्यास सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तानवर मोठं संकट कोसळलं आहे. त्यामुळं आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला आता भीक मागण्याचीही सोय राहिली नसल्याचं चित्र आहे. देश गहाण ठेवणं किंवा विकण्याशिवाय पाकिस्तानला काहीच पर्याय नाही, अशी स्थिती पाकिस्तानवर येऊन ठेपलीय. यातही अडचण आहे. कारण आधीच पाकिस्तानवर चीनचं मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. चीनचं कर्ज तर दूरच व्याज भरण्याचीही पाकिस्तानची परिस्थिती राहिलेली नाही. त्यातच आता सौदी अरबनं पाकिस्तानला सर्वात मोठ्या अडचणीत टाकलंय.

सौदी अरबनं ‘चेकबूक डिप्लोमेसी’ बंद केलीय. सौदीचे प्रिंस सलमान यांनी अशी सवलत देण्यावरच बंदी आणलीय. याचा सर्वाधिक परिणाम लेबनॉन आणि पाकिस्तानवर झालाय. हे दोन्ही देश सौदीकडून मिळणाऱ्या पेट्रो डॉलरवर उदरनिर्वाह करत होते. पण, आताच्या निर्णयामुळे या देशांना सौदीकडून पैसे मिळणार नाहीत. एवढंच नाही तर आधी घेतलेलं 5 अरब डॉलर्सचं कर्जही फेडावं लागणार आहे.

खरंतर हा निर्णय सौदीनं केवळ पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी घेतलेला नाही. तर आतापर्यंतच्या अनुभवानूसार प्रिन्स सलमाननं हा मोठा निर्णय घेतलाय. पेट्रो डॉलर वाटून सौदीच्या शाही परिवाराला काहीही फायदा झाला नसल्याचं पुढे आलं आहे. त्यांचा प्रभावही वाढलेला नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आलंय. त्यामुळं रियादच्या धोरणकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर सौदीनं आपलं हे धोरण बदलण्याचा निर्णय घेतला.

सौदी अरबची आतापर्यंतची रणनीती काय?

सौदी अरब आपल्या मित्र देशांना या आधी मदद करत होता. इतकंच नाही तर सौदी अरब आपल्या शत्रु राष्ट्राच्या शत्रुलाही पैशांची मदत करायचा. बलवान होणं हाच अरबों डॉलर्स खर्च करण्याचा त्यांचा उद्देश होता. सौदीला जगात बलशाली अशी ओळख निर्माण करायची होती. आर्थिक मदतीनं मुस्लीम देशांचं नेतृत्व करायची सौदी अरबची इच्छा होती. पण, आता त्यांचा प्रभाव दुर्लक्षित करुन तुर्की, इराण असे देशही सौदी अरबला आव्हान देतायेत. आतापर्यंत सौदीनं याच राष्ट्रांना पेट्रो डॉलर्स देत मदत केली. पाकिस्तानसारख्या मोठी मदत केलेल्या देशाचे मंत्रीही आता सौदीला धमकी देतायेत.

सौदी प्रिन्स पाकिस्तान सरकारवर नाराज आहेत. प्रिन्स सलमान हे महमूद कुरैशींच्या वक्तव्यानं संतप्त झाले आहेत. कुरैशींनी नवीन मुस्लीम गट बनवण्याची धमकी दिली होती. यालाच सौदीच्या वर्चस्वाला आव्हान असल्यानं प्रिन्स सलमान समजतायेत. त्यामुळं सौदी अरबच्या खैरात बंदीच्या निर्णयात पाकिस्तानच सर्वात मोठा व्हिलन असल्याचं जाणकार मानतायेत. पाकिस्ताननं सौदी अरबलाच धमकी दिली, पण पाकिस्तान स्वत:ला मुस्लीम राष्ट्राचा नेता समजू लागलाय. त्यामुळंच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सौदी अरबनं आता चेकबुक डिप्लोमसी बंद करण्याची घोषणा केलीय. त्यामुळं आता पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा :

चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

पाकिस्तानच्या जीडीपी इतकं आमचं केवळ आर्थिक पॅकेज, मदतीची ऑफर देणाऱ्या इम्रान खान यांना भारताच्या कानपिचक्या

Saudi Arabia stop financial help to Pakistan

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.